भयंकर… पत्रकाराचं मुंडकं छाटून अमेरिकेला धाडला व्हिडिओ!
‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांनी मंगळवारी एक व्हिडिओ जाहीर केलाय. यामध्ये वर्ष 2012 पासून बेपत्ता असलेल्या एका अमेरिकन पत्रकाराचं मुंडकं छाटतानाचं क्रूर दृश्यं चित्रीत करण्यात आलंय. यासोबतच, अमेरिकेनं, इराकवर हवाई हल्ले बंद केले नाहीत तर आपल्या ताब्यात असलेल्या आणखी एका अमेरिकन पत्रकाराचीही तीच दशा करण्याची धमकीही या व्हिडिओमध्ये देण्यात आलीय.
Aug 20, 2014, 01:43 PM ISTएका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा
जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.
Aug 9, 2014, 08:33 AM ISTइराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज
इराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज
Aug 8, 2014, 02:31 PM ISTइराकच्या ISIS दहशतवाद्यांवर अमेरिका करणार हल्ला
दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ला करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची घोषणा. इराकमध्ये जे काही घडते आहे त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करु शकत नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं आहे.
Aug 8, 2014, 10:13 AM ISTमराठमोळी नेहा ओबामा दाम्पत्यासाठीही ठरली 'प्रेरणा'!
मुंबईत गोरेगावला राहणाऱ्या 23 वर्षीय नेहा नाईक या मराठमोळ्या तरुणीला व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची संधी मिळतेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेटही ती यावेळी घेणार आहे.
Jul 28, 2014, 01:19 PM ISTMH-17 विमान अपघात : रशिया समर्थक बंडखोर जबाबदार- ओबामा
मलेशिया एअरलाईन्सचे MH-17 हे बोइंग प्रवासी विमान क्षेपणास्त्राने पाडणाऱ्या रशिया समर्थक बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. युक्रेनमधील बंडखोरांना रशियाचा पाठिंबा असल्याचे, ओबामा म्हणालेत.
Jul 19, 2014, 10:19 AM ISTअखेर... नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार!
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचं औपचारिक आमंत्रण दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आमंत्रण स्विकारल्याचं समजतंय.
Jul 11, 2014, 03:46 PM ISTअमेरिकेनं दिले होते भाजपच्या हेरगिरीचे आदेश
भारताचा प्रमुख राजकीय पक्ष भाजपसह जगातील सहा प्रमुख पक्षांवर पाळत ठेवण्याचा परवाना अमेरिकेन कोर्टानं २०१० साली नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला (एनएसए) दिल्याचा गौप्यस्फोट ‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय.
Jul 2, 2014, 10:14 AM ISTगरज भासल्यास इराकमध्ये सैन्य घुसवू - अमेरिका
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराक प्रश्नी मौन सोडलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलंय. गरज पडली तरच इराकमध्ये सैन्य पाठवलं जाईल मात्र पुन्हा युद्ध व्हावं अशी आमची इच्छा नाही, असंही ते म्हणालेत.
Jun 20, 2014, 03:49 PM ISTमोदींच्या दौऱ्याचे वृत्त चुकीचे - अमेरिका
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही वॉशिंग्टनमध्ये स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकाविषयी प्रसिद्ध होत असलेली वृत्ते चुकीची आहेत. तारखा भेटीच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Jun 7, 2014, 08:43 PM ISTओबामानंतर नरेंद्र मोदी फेसबुकवरील दुसरे सर्वात प्रसिद्ध नेते!
नरेंद्र मोदी हे भारतातच नाही परदेशामध्येही तितकेच प्रसिद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणता नेता प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे नरेंद्र मोदी. मोदींच्या फेसबुक पेजचे लाईक्स आणि शेअरिंग बघता मोदी जगात दुसऱ्या नंबरवर आहेत.
May 21, 2014, 04:10 PM ISTओबामांच्या हत्येचा कट रचणाऱ्याला फाशीची शिक्षा
अमेरिकेत न्यायमूर्तींनी अखेर एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
May 14, 2014, 08:47 PM ISTभारतीय नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक - ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनाही नव्या सरकारचे वेध लागले आहेत. भारताच्या नव्या लोकनियुक्त सरकारसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं ओबामांनी म्हटलयं.
May 13, 2014, 02:49 PM ISTओबामांच्या मुलींचा पाठलाग करणारा जेरबंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुलींना घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग केला गेल्यानंतर व्हाइट हाऊस सध्या बंद करण्यात आलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अति सुरक्षा असलेल्या परिसरात अधिकाऱ्यांनी पाठलाग करण्याऱ्या कारला रोखलं आणि कार चालकाला ताब्यात घेतलं.
May 7, 2014, 06:07 PM ISTभारतातील अमेरिकेच्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांचा राजीनामा
देशात लोकसभा निवडणुकीदरम्यान अमेरिकेच्या भारतातल्या राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. युपीएतल्या परराष्ट्र व्यवहार धोरणकर्त्यांशी जवळीक असल्यानं पॉवेल यांना अमेरिकेत तातडीनं माघारी बोलावून घेण्यात आल्याचं बोललं जातंय.
Apr 1, 2014, 10:45 AM IST