अखेर... नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार!

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचं औपचारिक आमंत्रण दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आमंत्रण स्विकारल्याचं समजतंय. 

Updated: Jul 11, 2014, 03:49 PM IST
अखेर... नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार! title=

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचं औपचारिक आमंत्रण दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आमंत्रण स्विकारल्याचं समजतंय. 

अमेरिकेच्या उपपरदेश मंत्री विलियम बर्न्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी आमंत्रणाचं औपचारिकता पूर्ण करत एक पत्र पंतप्रधानांकडे सोपवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला जातील. 

मोदींनी या आमंत्रणाबद्दल आभार प्रदर्शित करत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या यात्रेची आपल्याला उत्सुकता असल्याचं म्हटलंय. काही ठोस परिणाम हाती लागण्यासाठी ‘नवी गती आणि ऊर्जा’ या दौऱ्यात मिळेल, अशी आशा मोदींना आहे.  

बर्न्स यांनी भारत-अमेरिकेदरम्यानचे आर्थिक संबंध मजबूत करण्याची ओबामा यांची इच्छा सांगितली. ज्यामध्ये, पुढची पीढी औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्र, ऊर्जा सुरक्षा वाढविण्यासाठी सहकार्य, समुद्र सुरक्षा यासोबतच दहशतवाद विरोध आणि गुप्तचर आदान-प्रदान अशा काही विषयांवर चर्चा करण्याचाही समावेश आहे.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.