भाजपा

सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शहांना क्लीन चीट

भाजप अध्यक्ष अमित शाह यांना मोठा दिलासा मिळालाय. सोहराबुद्दीन आणि तुलसी प्रजापती एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयच्या विशेष कोर्टानं अमित शाह यांना क्लीन चिट दिलीय.

Dec 30, 2014, 08:07 PM IST

48 तासात संपत्ती जाहीर करा, मोदींचा भाजप खासदारांना इशारा

मोदी सरकारला लवकरच सहा महिने पूर्ण होणार आहेत, त्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी भाजपच्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. 

Nov 26, 2014, 05:20 PM IST

गुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई भाजपमध्ये दाखल

 मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गुरूदास कामत यांचा भाचा समीर देसाई यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार आशिष शेलार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या उपस्थितीत देसाई यांनी प्रवेश केला, समीर देसाई हे काँग्रेसचे नगरसेवक देखिल होते.

Nov 16, 2014, 09:31 PM IST

निवडणूक आयोगाची `वाचाळ` नेत्यांवर कारवाई

भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी निवडणूक  आयोगानं भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आणि सपाचे नेते आझम खान यांच्या सभांवर बंदी घातलीय.

Apr 12, 2014, 07:59 AM IST

भाजपा `वन मॅन पार्टी`च्या दिशेने - अडवाणी

भाजप हा पक्ष वन मॅन पार्टीच्या दिशेने जात असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

Mar 5, 2014, 07:33 PM IST

‘माझं आणि नरेंद्र मोदींचं स्वप्न सारखंच’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी शरूर यांनी आपलं आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचं स्वप्न एकच असल्याचं सांगत अनेकांच्या नजरा आपल्याकडे वळवल्यात.

Sep 7, 2013, 04:07 PM IST

मोदींनी केला 20 अब्ज रुपयांचा भ्रष्टाचार!

आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधताना चक्क नरेंद्र मोदींवरच आरोपांची तोफ डागली आहे.दोन कंपन्याकडून तंत्रविषय मदत घेण्याच्या बहाण्याने त्यांनी खासगी कंपन्यांना सरकारी कंपन्यांच्या उत्पन्नातील 20 अब्ज रुपयांची भागीदारी दिली आसल्याचा केजरीवाल यांनी आरोप केला आहे.

Dec 6, 2012, 04:58 PM IST

सिद्धूचं भाषण, भाजपलाच टेन्शन

आपल्या क्रिकेटमधील फलंदाजीइतकंच आपल्या वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूला गुजरातमध्ये प्रचारसाठी भाजपाने बिग बॉस-6मधून बाहेर बोलावून घेतलं. मात्र, त्याच्या बेछुट वक्तव्यांमुळे भाजपलाच कापरं भरलं आहे. त्यामुळे सिद्धूने प्रचारादरम्यान संयमाने बोलावं असे निर्देश त्याला देण्यात आले आहेत.

Dec 4, 2012, 04:49 PM IST

मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची कुठलीही यादी नाही. मोदी हे सर्वार्थानं त्या पदासाठी योग्य असल्याचं स्वराज यांनी म्हटलंय.

Dec 1, 2012, 07:38 PM IST

नाशिकमध्ये सत्ताधारींविरोधात शिवसेना-मनसेचा एल्गार

नाशिकच्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास निधीवरून चांगलच राजकारण पेटलंय. तीन महिने पाठपुरावा करूनही सत्ताधारी ताकास तूर लागू देत नसल्यानं संतापलेल्या विरोधकांनी तीन दिवसांपासून विविध माध्यमातून आंदोलन चालू ठेवलं.

Dec 1, 2012, 06:42 PM IST

भाजपा सोडताना अखेर येदियुरप्पा रडले

भाजपामधील वादग्रस्त नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी अखेर भाजपाचा निरोप घेतला आहे. मात्र भाजपामधून बाहेर पडताना येदियुरप्पांनाही रडू कोसळलं.

Nov 30, 2012, 05:25 PM IST

गडकरींनी तत्काळ राजीनामा द्यावा - यशवंत सिन्हा

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

Nov 20, 2012, 08:01 PM IST

पुणे फेस्टिव्हल: भुजबळांची दांडी, मुंडेंच्या मांडीला मांडी

कलमाडींचं अधिराज्य असलेल्या पुणे फेस्टिव्हलचं नेते-अभिनेते आणि खेळाडूंच्या उपस्थितीत शानदार उदघाटन झालं खरं. मात्र, छगन भुजबळांची दांडी आणि गोपीनाथ मुंडेंची कलमाडींच्या मांडीला मांडी. यामुळे फेस्टिव्हल रंगला तो बाकीच्याच चर्चेने...

Sep 22, 2012, 10:44 AM IST

`पंतप्रधान की मल्टीनॅशनल कंपनीचे सीइओ?`

विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिला. तर गॅस आणि डिझेल दरवाढीचंही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचंच जणू स्पष्ट केलंय. एकूणच या निर्णयांमुळं भाजपनं पंतप्रधान एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीचे सीईओ असल्याप्रमाणे काम करत असल्याचं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय.

Sep 22, 2012, 10:31 AM IST

भाजप विरुद्ध भाजप

उद्याच्या भारत बंदमध्ये पुण्यात भाजप सहभागी होणार नाही.. गणेशोत्सव आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय.. डिझेल दरवाढ आणि एफडीआयविरोधात एनडीएनं भारत बंदची हाक दिलीय.. मात्र पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि पर्युषण पर्वमुळं बंदमध्ये भाजप सहभागी होणार नसल्याचं शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी सांगितलंय.. तसंच पुण्यातल्या नागरिकांनी ऐच्छिक बंद पाळावा असं त्यांनी म्हटलंय

Sep 19, 2012, 08:54 PM IST