भाजपा

पंतप्रधानांचा राजीनामा नको- भाजपा

कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसाकांडप्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्य़ावर अडून बसलेल्या भाजपनं आता एक पाऊल मागं घेण्याची तयारी दर्शवली आहे.

Sep 2, 2012, 12:37 PM IST

हे तर मॅचफिक्सिंग- मुलायमसिंग यादव

संसदेत भाजपनं सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असला तरी दुसरीकडे मुलायम सिंहांनी मात्र विरोध दर्शवलाय. हे दोन्हा पक्षांना चर्चा नको असून हे सर्व काँग्रेस भाजपचं फिक्सिंग असल्याचा आरोप मुलायमसिंह यांनी केलाय.

Aug 30, 2012, 12:35 PM IST

कोळसा घोटाळ्यात सरकारकडून दिशाभूल- जेटली

कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी भाजपनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. कोळसा वाटपात शुन्य तोटा झाल्याचा सरकारनं केलेला दावा हास्यास्पद असल्याचं भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ज्या दिवशी सरकारनं कोळसा खाणींचं वाटप केलं त्या दिवशीच सरकार तोट्यात गेलं असा दावा जेटलींनी केलाय.

Aug 25, 2012, 05:09 PM IST

संसदेत... टार्गेट पंतप्रधान

आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेत कोळसा खाण घोटाळ्यावरून गदारोळ माजल्यानं कामकाजाला स्थगिती देण्यात आलीय.`चर्चा नको राजीनामा हवा...` असं म्हणत विरोधकांनी संसदेत आक्रमक पवित्रा घेतलाय.

Aug 22, 2012, 11:17 AM IST

पुरावा नसताना राजीनामा का?- पंतप्रधान

संसदेत आज सादर झालेल्या कॅग अहवालानं धुमाकूळ घातला. संसदेत विरोधी पक्षानं पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. त्यानंतर सुरू झालेल्या गोंधळानंतर राज्यसभा आणि लोकसभा ही संसदेची दोन्ही सभागृह स्थगित करण्यात आलीत.

Aug 21, 2012, 11:46 AM IST

खड्ड्यांवरून भाजपाचा शिवसेनेला घरचा आहेर

मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेनं तयार केलेली पॉटहोल्स ट्रेसिंग सिस्टिम अयशस्वी ठरल्याची टीका पालिकेतील भाजप गटनेता दिलीप पटेल यांनी केली आहे. या सिस्टिमद्वारे ज्या खड्डयाचे फोटो काढलेत तेच खड्डे बुजवले जात आहेत.

Jul 24, 2012, 10:52 PM IST

केशूभाईंनी ओकलं गरळ, म्हणे मोदी 'सडकं फळ'!

गुजराथचे माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. गेल्यावेळी मोदींना हिटलरची उपमा देऊन झाल्यावर यावेळी केशूभाईंनी मोदींना सडक्या फळाची उपमा केली आहे. नरेंद्र मोदी म्हणजे सडकं फळ असून त्यांना फेकून दिलं पाहिजे असं वक्तव्य केशूभाईंनी केलं आहे.

Jul 19, 2012, 05:31 PM IST

सदानंद गौडांचा अखेर राजीनामा

कर्नाटकात भाजपनं पुन्हा एकदा येडियुरप्पांपुढे सपशेल नांगी टाकली आहे.येडियुरप्पांच्या दबावापुढे झुकत भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांच्या नावाची घोषणा केली.

Jul 8, 2012, 12:48 PM IST

काँग्रेसमध्ये गटबाजी चालूच राहील- दिग्विजय सिंग

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी वाढतच्या भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त करत असतानाच काँग्रेसमधील गटबाजीवरही भाष्य केलं. याशिवाय भाजपाने आपल्यावर केलेल्या कुठल्याच आरोपांचा पुरावा भाजपाकडे नसल्याचाही दावा केला.

Jul 2, 2012, 09:05 AM IST

'शिवसेना अफझलच्या फाशीची मागणी करेल का?'

राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिल्यानं भाजप-सेनेत निर्माण झालेला तणाव कायम आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या भाजपच्या मागणीला शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Jun 20, 2012, 08:42 PM IST

नरेंद्र मोदी म्हणजे रावण- दिग्विजय सिंग

भाजपा पक्षातून राजीनामा दिलेल्या संजय जोशींचं सांत्वन करून झाल्यावर वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. दिग्विजय सिंग यांनी मोदींची तुलना रावणाशी केली आहे.

Jun 13, 2012, 04:27 PM IST

नाराजी, बंड आणि तोडफोड

महापालिका निवडणुकांचे वारे जोराने वाहायला सुरुवात झालीय. आघाडी आणि युतीच्या बोलणी झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आता अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.

Jan 13, 2012, 05:07 PM IST

'त्या' कार्यकर्त्यांची हाकालपट्टी- मुनगंटीवार

तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांची गय केली जाणार नाही. त्यांची पक्षातून हाकालपट्टी केली जाईल, असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Jan 13, 2012, 05:05 PM IST

शेवाळेंमुळे भाजप कार्यकर्ते खवळले

मुंबई चेंबूर भागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवला. या भागातला वॉर्ड क्रमांक १३४, शिवसेनेला सोडण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. या वॉर्डातून शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडणूक लढवणार आहेत.

Jan 9, 2012, 07:24 PM IST

सरकारकडे बहुमत नाही, राजीनामा द्या - भाजपा

भाजपाने सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा मिळू शकला नाही आणि त्यामुळेच सरकारवर नामुष्की ओढावली. लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत आपल्याकडे दोन तृतियांश असं स्पष्ट बहूमत नसल्याचं मान्य केलं आणि त्यामुळे विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले.

Dec 28, 2011, 04:49 PM IST