सरकारकडे बहुमत नाही, राजीनामा द्या - भाजपा

भाजपाने सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा मिळू शकला नाही आणि त्यामुळेच सरकारवर नामुष्की ओढावली. लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत आपल्याकडे दोन तृतियांश असं स्पष्ट बहूमत नसल्याचं मान्य केलं आणि त्यामुळे विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले.

Updated: Dec 28, 2011, 04:49 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 भाजपाने सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. संख्याबळ नसल्याने लोकपाल  विधेयकाला घटनात्मक दर्जा मिळू शकला नाही आणि त्यामुळेच सरकारवर नामुष्की  ओढावली. लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी  लोकसभेत आपल्याकडे दोन तृतियांश असं स्पष्ट बहूमत नसल्याचं मान्य केलं आणि त्यामुळे  विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले.

राहूल गांधींच्या स्वप्नं भंगलं आणि संसदेत सरकारकडे संख्याबळ नाही अशी मागणी यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

प़डद्यामागे काही तरी घडल्याची शंका घ्यायला वाव आहे. आपल्यावर अंकुश ठेवणारी व्यवस्था अडचणीची ठरु शकते त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा यांच्यात एकमत झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया कुमार सप्तर्षी दिली.

टीम अण्णातील सदस्य विश्वंभर चौधरींनी देखील सरकारवर सडकून टीका केली. संसदेच्या चर्चेत गांभीर्य नव्हतं हेच लोकपाल विधेयकला घटनात्मक दर्जा मिळू शकला नाही यामुळे सिध्द होतं. ग्रामपंचायतीचे कामकाज सुध्दा संसदेच्या तुलनेत अधिक चांगल्या प्रकारे चालतं अशी घणाघाती टीका चौधरींनी केली.

लोकपाल आणि लोकायुक्त आणण्याची भाजपाची मनापासून इच्छा नव्हती असं कपिल सिब्बल म्हणाले.