मुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य
मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.
Apr 23, 2014, 05:41 PM ISTइंदिराजींसारखाच खंबीरपणे सामना करेन - प्रियांका
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या प्रियांका गांधी अखेर आमने-सामने आले आहेत. रॉबर्ट वडेरा यांच्यावर मोदींनी केलेल्या आरोपांना प्रियांका गांधींनी पहिल्यांदाच जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 23, 2014, 12:28 PM IST`एम` फॉर मोदी आणि... `एम` फॉर मुस्लिम?
सध्या `एम स्केअर`ची जोरदार चर्चा सुरू आहे... मोदींचा `एम प्लान`... भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी २०१४चं सर्वात मोठं राजकीय युद्ध जिंकण्यासाठी एक खास `एम प्लान` तयार केलाय
Apr 23, 2014, 12:04 PM ISTमतदार राजा, अफवांवर विश्वास ठेवू नकोस
मुंबई, ठाण्यात गुरुवारी लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदान होतंय. पण, याआधीच आपली नावं मतदार यादीत आहेत की नाहीत याबद्दल नागरिकांनी आत्ताच खात्री करून घेण्याचं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलंय.
Apr 23, 2014, 10:57 AM ISTमोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये?
मोदींच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवतोय. मोदी `इलेक्शन मूड`मधून `गव्हर्नन्स मूड`मध्ये आलेत का? असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे राहुल गांधीकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की, राहुल गांधींच्या भाषणातला आक्रमकपणा वाढलाय... का झाला दोघांच्या वागण्याबोलण्यातला बदल?
Apr 23, 2014, 10:14 AM ISTमुंबई कुणाची? महायुती आघाडीला सुरूंग लावणार?
मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.
Apr 22, 2014, 10:44 PM ISTगिरीराज सिंहांना वादग्रस्त विधान भोवलं, प्रचारावर बंदी
वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीराज सिंग यांच्यावर निवडणूक आयोगानं निर्बंध लादलेत. त्यांना बिहार आणि झारखंडमध्ये प्रचारास बंदी घालण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. तसंच त्यांना स्वतंत्र कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.
Apr 22, 2014, 10:34 PM ISTभगवान बुद्धानंही सोडलं होतं पत्नीला, मोदींची भावाकडून पाठराखण
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सोमवारी मोदींच्या विवाहाबाबत त्यांची पाठराखण केलीय. ते म्हणाले, भगवान बुद्धानंही आपल्या पत्नीला सोडलं होतं, तेव्हा त्यांना कोणी नाही विचारलं की त्यांना का बरं हे पाऊल उचललं?.
Apr 22, 2014, 09:31 PM ISTरामदास कदमांच्या `त्या` वक्तव्यावरून मोदी नाराज, शिवसेनेकडून स्पष्टीकरण
महायुतीच्या कालच्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम यांनी पाकिस्तानबाबत केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर 6 महिन्यांत पाकिस्तान नेस्तनाबूत होईल, असं कदम म्हणाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधानापासून स्वतःला आणि पक्षाला वेगळं काढलंय. हे विधान बाळासाहेबांच्या भूमिकेशीही विसंगत असल्याचं ठाकरे म्हणालेत.
Apr 22, 2014, 08:44 PM ISTराज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या
२४ तारखेला लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातलं तिसरा टप्प्यातलं मतदान होत आहे. यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला. उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकणातली एक जागा आणि ठाणे जिल्ह्यातल्या एकूण १९ जागांवर २४ तारखेला मतदान होणार आहे. एकूण 338 उमेदवारांचं भवितव्य या मतदानानं निश्चित होणार आहे.
Apr 22, 2014, 08:09 PM ISTजागे व्हा... मतदान करा (व्हिडिओ)
तरूण मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी अरिना मल्टीमीडियाने एक व्हिडिओ तयार केला आहे. झी २४ तासच्या वाचक श्रद्धा त्रिपाठी यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे.
Apr 22, 2014, 07:00 PM ISTनरेंद्र मोदींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री कोण?
भाजपनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित झालाय. मोदींनंतर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोण होणार विराजमान? या प्रश्नाचं उत्तर आहे आनंदीबेन पटेल.
Apr 22, 2014, 05:17 PM ISTपाकिस्तानात भाजपनं केली वेबसाइट ब्लॉक, मोदींचं पोर्टल सुरू
पाकिस्तानातील नागरीक भारतीय जनता पक्षाची वेबसाइट पाहू शकत नाही, कारण भाजपनं आपली इंटरनेट पेज पाकिस्तानात ब्लॉक केलंय. मात्र भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक त्यांच्या पोर्टलवर जावू शकतात.
Apr 22, 2014, 04:19 PM ISTबायचुंग भुतियाचं `मराठी प्रेम`!
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा जावई टीएमसीच्या तिकिटावर पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मतदारसंघातून आपलं राजकारणातील नशिब आजमावतोय.
Apr 22, 2014, 02:16 PM ISTराहुल गांधी गरिबीची थट्टा करतात, मोदींचा हल्लाबोल
बीकेसीमध्ये झालेल्या सभेत नरेंद्र मोदींनी माँ-बेटेकी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. या सरकारमध्ये कुठलंही उत्तर देण्याची हिंमत नाही, हे फक्त गरिबीची थट्टा करतात आणि राहुल गांधी गरिबीचं टुरिझम करतात, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि भाषणात सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
Apr 21, 2014, 09:29 PM IST