www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई, ठाण्यात गुरुवारी लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदान होतंय. पण, याआधीच आपली नावं मतदार यादीत आहेत की नाहीत याबद्दल नागरिकांनी आत्ताच खात्री करून घेण्याचं आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केलंय.
मुख्य म्हणजे, तुमची नावं निवडणूक यादीत नसतील तरी तुम्हाला मतदानाच्या दिवशी नावनोंदणी करून मतदान करता येईल, असा खोटा प्रचार सध्या विविध सोशल माध्यमांतून करण्यात येतोय, तो धादांत खोटा असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
त्यामुळे, जागो ग्राहक जागो... आणि मतदानापूर्वीच आपलं नाव मतदान यादीत असल्याची खात्री करून घ्या... या यादीत आपलं नाव नसेल तर याची ताबडतोब माहिती निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवा.
.
.
.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.