ऑडिट विधानसभा मतदारसंघ - मुंब्रा-कळवा
ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड इथे विद्यमान आमदार आहेत. सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. तर खासदार ओवेसी यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आव्हाड यांना आता तगडे आव्हान या मतदार संघात असणार आहे.
Oct 1, 2014, 06:16 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - ठाणे शहर
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ. आमदार म्हणून निवडून आलेले राजन विचारे आता खासदारपदी विराजमान झालेत. आता काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले रवींद्र फाटक यांना सेनेने उमेदवारी दिली आहे. ते नारायण राणे समर्थक होते. या मतदार संघात सेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे फाटक यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे.
Oct 1, 2014, 06:06 PM ISTपेड न्यूज प्रकरण अशोक चव्हाणांना कोर्टाचा दणका
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असं चित्र आहे.
Oct 1, 2014, 06:02 PM ISTसेना–भाजप युती : प्रवास, मतभेद आणि यश
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपशी सैध्दांतिक एकरूपता असणारा शिवसेना हा बहुधा एकमेव पक्ष आहे; किंबहुना तो भाजपचा पहिला मित्रपक्ष आहे.
Oct 1, 2014, 05:07 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - भंडारा
भंडारा विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर इथे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेच्या या लढाईत मित्रपक्षांच्या छुप्या हालचालीही तितक्याच महत्वपूर्ण ठरतात.
Oct 1, 2014, 05:07 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - तुमसर, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघ पूर्वी भाजपचा गड समजला जाई. मात्र 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर अनिल बावनकर यांनी विजयी पताका फडकावली आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला.
Oct 1, 2014, 04:58 PM ISTआमीर खान मतदान करणार नाही
अभिनेता आमीर खान यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. विधानसभेचं मतदान 15 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी आमीर खान मुंबईत नसून अमेरिकेत असणार आहे.
Oct 1, 2014, 04:56 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - साकोली, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघ. इथले आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करत खासदारकी मिळवलीयं.
Oct 1, 2014, 04:47 PM ISTशिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला
शिवसेनेला मुंबईत एक धक्का बसला आहे, राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय. अंधेरी पश्चिमच्या वर्सोवा मतदारसंघातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी निवडणूक आयोगाने फेटाळला.
Oct 1, 2014, 04:28 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - आर्णी, यवतमाळ
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला यवतमाळचा आर्णी विधानसभा मतदारसंघ. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे येथून प्रतिनिधित्व करतात.
Oct 1, 2014, 04:22 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - पुसद, यवतमाळ
पुसद मतदारसंघ म्हणजे नाईक घराणे. पहिल्या निवडणुकीपासून नाईक घराण्यातील सदस्यच येथून निवडून आलेला आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने राज्याला दिले. सध्या इथे राष्ट्रवादीचे मनोहर नाईक नेतृत्व करतात.
Oct 1, 2014, 04:11 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे ग्रामीण
धुळे ग्रामीण मतदारसंघ. एकेकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून लक्ष वेधणारे रोहिदास पाटील यांना याच मतदारसंघात गेल्यावेळी पराभूत व्हावं लागलं. शिवसेनेच्या शरद पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
Oct 1, 2014, 03:56 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - धुळे शहर
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे विद्यमान आमदार आहेत. जातीची समीकरणं मांडत धुळ्यातल्या राजकारणाची गणितं मांडली जातात. पांझरा नदीच्या मध्यमागी मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर वसलेलं हे धुळे शहर.
Oct 1, 2014, 03:46 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - नंदूरबार
नंदूरबार विधानसभा मतदारसंघ. तब्बल चारवेळा निवडून आलेल्या आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या डॉ. विजयकुमार गावित यांनी आता भाजपची वाट धरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नंदूरबारमध्ये खरी चुरस निर्माण झाली आहे.
Oct 1, 2014, 03:13 PM ISTमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अनंत गीते
मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अनंत गीते
Oct 1, 2014, 03:05 PM IST