assembly 2014

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर... डिझेल, पेट्रोलचे दर घटणार?

डिझेल आणि पेट्रोलच्या ग्राहकांना विधानसभा निवडणुकीआधीच खुशखबरी मिळणार आहे... कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट होण्याची शक्यता निर्माण झालीय.

Sep 26, 2014, 03:03 PM IST

ठाकरे + ठाकरे... राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप!

 महाष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-मनसे एकमेकांच्या संपर्कात

Sep 26, 2014, 02:11 PM IST

शिवसेनेते पहिल्या बंडखोरीची शक्यता

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेत पहिली बंडखोरी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

Sep 26, 2014, 01:42 PM IST

भाजप- राष्ट्रवादी साटेलोटे नाही- अजित पवार

भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय... हा आरोप खोटा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. 

Sep 26, 2014, 01:24 PM IST

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजपची मागणी

महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं होतेय. आज संध्याकाळी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुका राष्ट्रपती राजवटीखाली होतील, अशी शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतली.

Sep 26, 2014, 01:08 PM IST

‘महाराष्ट्राला स्वातंत्र्य नको स्वायत्तता द्या’

‘महाराष्ट्राला स्वातंत्र्य नको, स्वायत्तता द्या’ असं म्हणत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केंद्र सरकारला इशारा दिलाय.

Sep 26, 2014, 01:06 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस - मराठवाड्यातील उमेदवार

 विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेससोबत कालच घटस्फोट घेतल्यानंतर राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केले आहेत.

Sep 26, 2014, 12:59 PM IST

सोशल मीडियावर सेनेला पाठिंबा, भाजपला लाखोल्या

२५ वर्षांची अभेद्य शिवसेना-भाजप युती तुटली.  भाजपने अधिकच्या जागा मागत 'खेळी' करत शिवसेनेशी असलेला घरोबा तोडला. शिवसेनेच्या जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार सेटींग केले. मात्र, त्यात अपयश आल्याने युतीच संपुष्टात आणली. घटक पक्षांना न्याय मिळत नसल्याचे कारण पुढे करत, वेगळे होण्याचा निर्णय घेतला. याबाबत सोशलमीडियात तिखड प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती माणूस ठरवणार का?

Sep 26, 2014, 12:29 PM IST

उमेदवारांची यादी : शिवसेनेचे उमेदवार जाहीर

शिवसेनेने आपली अधिकृत यादी जाहीर न करताच उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरायला सांगितलंय. त्यामुळं आज शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज भरायला सुरूवात केलीय.  

Sep 26, 2014, 12:24 PM IST

शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर - आठवले

भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्या पक्षासोबत जायचं, असा पेच घटकपक्षांसमोर होता. यात सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे यांनी भाजपची वाट धरली... तर युती तुटल्याची घोषणा झाल्याच्या 24 तासानंतरदेखील आरपीआयचे रामदास आठवले दोन्ही पक्षांशी बोलणी करत होते... या भेटीबाबत विचारलं असता पत्रकारांशी बोलताना 'शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं' हसत हसत म्हटल.

Sep 26, 2014, 12:19 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत जाणार - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विचार करुन निर्णय घेऊ असे शेट्टी म्हणाले होते. आज आपला निर्णय त्यांनी जाहीर केला.

Sep 26, 2014, 12:02 PM IST

भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - फडणवीस

भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचं सांगताना, राष्ट्रवादीची युती कोणाशी आहे, हे महाराष्ट्राला माहीत असल्याचं सांगत, शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sep 26, 2014, 11:43 AM IST

‘ब्लू प्रिंट’ आली, कुणी नाही पाहिली!

१० सप्टेंबरला ९ वर्षांपासून प्रतिक्षित असलेली मनसेची ब्लू प्रिंट सादर न करणं, राज ठाकरेंना किती चुकीचं ठरलं, हे त्यांना काल घडलेल्या प्रकारानंतर राज ठाकरेंना वाटत असेल. कारण पितृपक्षामुळं आपल्या ब्लू प्रिंट सादर करण्याचा मुहूर्त राज ठाकरेंनी पुढे ढकलला, पण राज्यात झालेल्या राजकीय घटस्फोटामुळं या ब्लू प्रिंटची हवाही लागली नाही.

Sep 26, 2014, 10:04 AM IST