शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर - आठवले

भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्या पक्षासोबत जायचं, असा पेच घटकपक्षांसमोर होता. यात सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे यांनी भाजपची वाट धरली... तर युती तुटल्याची घोषणा झाल्याच्या 24 तासानंतरदेखील आरपीआयचे रामदास आठवले दोन्ही पक्षांशी बोलणी करत होते... या भेटीबाबत विचारलं असता पत्रकारांशी बोलताना 'शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं' हसत हसत म्हटल.

Updated: Sep 26, 2014, 10:38 PM IST
शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर - आठवले title=

मुंबई : भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्या पक्षासोबत जायचं, असा पेच घटकपक्षांसमोर होता. यात सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे यांनी भाजपची वाट धरली... तर युती तुटल्याची घोषणा झाल्याच्या 24 तासानंतरदेखील आरपीआयचे रामदास आठवले दोन्ही पक्षांशी बोलणी करत होते... या भेटीबाबत विचारलं असता पत्रकारांशी बोलताना 'शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं' हसत हसत म्हटल.

 

सायंकाळी ७.२०

- भाजपची घटक पक्षांना जागा देण्यासंदर्भातील बैठक सुरू 

- मुंबई भाजप मुख्यालयात बैठक सुरू

- ओम माथूर, राजीवर प्रताप रुडी, प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस बैठकीला हजर 

सायंकाळी ७.०४

काँग्रेसचे दीपक मानकर राष्ट्रवादी... अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश.... कसबा मतदार संघातून निवडणूक लढण्याची शक्यता... 
राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना पक्षाने तिकीट नाकारले आहे. मोहोळ मतदारसंघातून अजित पवार समर्थक रमेश कदम यांना तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येतेय. 

दुपारी ४. १७ 
सरदार तारा सिंग मातोश्रीवर पोहचलेत.. तारा सिंग भाजपचे आमदार आहेत.. 

लातूर : लातूर जिल्ह्यात काँग्रेसला भगदाड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज  पाटील नागराळकर आणि  काँग्रेसचेच राजेश्वर बुके यांचा  राष्ट्रवादीत प्रवेश. बसवराज  पाटील नागराळकर यांना निलंगा मतदार संघातून तर राजेश्वर बुके यांना औसा मतदार संघातून राष्ट्रवादीची उमेदवारी

अकोला: अकोला पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे विधान परिषदेतील  आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा शिवसेनेच्या वतीने उमेदवारी  अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून शिरीष धोत्रे यांचा अर्ज दाखल. माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल.

दुपारी  ३.२५ वाजता - 

अमित शहा उद्या मुंबईत, निवडणूक प्रचाराचा घेणार आढावा

राजीव प्रताप रुडी, भाजपची पत्रकार परिषद सुरू, सांगितले युती तुटण्याचे कारण...

दुपारी १.१० वाजता - 

# एकनाथ खडसे राज भवनाला पोहोचले, सोबत बबनराव पाचपुते

# मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. ४५ मिनीटं चर्चा

# स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबतच राहणार आहे. अशी घोषणा खासदार राजू शेट्टींनी केलीय..स्वाभिमानी शेतकरी संघटना 18 जागांवर लढणार आहे..
 
# राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना पक्षाने तिकीट नाकारले आहे. मोहोळ मतदारसंघातून अजित पवार समर्थक रमेश कदम यांना तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येतेय. 

# भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय

# भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय

# भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत भाजप जाणार नसल्याचं सांगताना, राष्ट्रवादीची युती कोणाशी आहे हे महाराष्ट्राला माहित असल्याचं सांगत, शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच विजयी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस आज नागपूर दक्षिण-पश्चिममधून आपला अर्ज भरणार आहे. 

# शिवसेना आणि भाजपची गेल्या पंचवीस वर्षांची युती तुटल्यानं आता केंद्रीय अवजड उद्योग मंत्री राजीनामा देणार का हा सवाल निर्माण झालाय. शिवसेना आणि भाजप राज्यात एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत असतांना आता गीते केंद्रीय मंत्रीमंडळात राहणार की राजीनामा देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

# राष्ट्रवादी आणि भाजपचं साटंलोटं असल्याचा आरोप माणिकराव ठाकरेंनी केलाय... मात्र राष्ट्रवादी आणि भाजपची विचारधारा वेगळी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी म्हटलंय. 

# विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेत पहिली बंडखोरी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. श्रीकांत सरमळकर हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागले आहेत. विद्यमान आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंतांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यामुळं सरमळकर हे बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.

# शिवसेना नगरसेविका डॉ. शोभा राऊळ बंडाच्या पवित्र्यात उभ्या ठाकल्या आहेत... दहिसरमधून शिवसेनेनं आमदार विनोद घोसाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं त्या नाराज आहेत. आता भाजपच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी केलीय... 

दुपारी १ वाजता - 

नागपूरचे काँग्रेसचे आमदार दीनानाथ पडोळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्य़े, काँग्रेसनं तिकीट नाकारल्यानं नाराज

अपक्ष आमदार अनिल बोंडे भाजपमध्ये, अमरावतीचे माजी आमदार सुनील देशमुख भाजपमध्ये... नितीन गडकरींच्या उपस्थितीत केला प्रवेश

दुपारी १२ वाजता- 

अजित पवारांनी बारामतीतून भरला उमेदवारी अर्ज

मुंबई: युती आणि आघाडीच्या घटस्फोटानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचाच दिवस उरलाय. त्यामुळं आज सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरायला सुरूवात केलीय. पक्षाच्या मोठ्या नेत्यापासून नवीन उमेदवारांनी अर्ज भरून प्रचाराला सुरूवात केलीय. 

शिवसेनेने आपली यादी जाहीर न करताच उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात केलीय.

शिवसेनेचे उमेदवार -

# अंधेरी (प.) - जयवंत परब

# अंधेरी (पू.) - रमेश लटके

# दिंडोशी - सुनील प्रभू

# कल्याण (प.) -  विजय साळवी

# वरळी -  सुनील शिंदे

# शिवडी - अजय चौधरी 

# वांद्रे (पू.) - बाळा सावंत 

तर वांद्रे पूर्वमधून शिवसेनेनं बाळा सावंत यांना उमेदवारी दिल्यानं श्रीकांत सरमळकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.