cm devendra fadnavis

उद्धव ठाकरे नगरसेवकांच्या तक्रारी घेऊन वर्षा बंगल्यावर

नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी 'वर्षा' या बंगल्यावर गेले होते. यावेळी उद्धव यांनी त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.

Aug 22, 2017, 11:00 PM IST

महाराष्ट्रात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला स्वातंत्र दिन !

 आपला स्वातंत्रदिन महाराष्ट्रात मंगळवारी अत्यंत जोश आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. मुंबई आणि कोकणातील काही भागात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कार्यक्रमात काही अडचणी आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानी आणि मंत्रालयात ध्वजारोहण केले. राजभवनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे राज्यपाल सी.वी. राव या खास दिवशी चैन्नईत असतील आणि स्वातंत्रदिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. 

Aug 15, 2017, 02:22 PM IST

लोकायुक्तांमार्फत होणार मेहता आणि देसाईंची चौकशी - मुख्यमंत्री

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वादात सापडलेले राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Aug 11, 2017, 09:32 PM IST

भाजपचे मंत्री प्रकाश मेहता अडचणीत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आश्वासन

एम. पी. मिल. कंपाऊंडच्या एसआरएप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. 

Aug 1, 2017, 11:22 AM IST

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रदेश भाजप मध्यावधी निवडणूकीसाठी तयार असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवाय निवडणुका झाल्या तर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. शेतक-यांच्या आंदोलनाच्यावेळी काही पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषा केली. त्यांना उत्तर देताना आम्ही मध्यावधीला तयार असल्याचं आम्ही सांगितलं होतं, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला आहे.

Jun 15, 2017, 08:34 AM IST

संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान, हिंसा घडविण्यात दोन्ही काँग्रेसचा डाव : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. 

Jun 1, 2017, 05:49 PM IST

मोदींच्या भेटीनंतर सीएम गप्पच, भाजपमध्ये प्रचंड असवस्थता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्री माघारी आले तरी ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असवस्थता आहे.

Mar 1, 2017, 08:12 PM IST

5 कोटी सैनिकांना देण्याच्या प्रस्तावाला आपला विरोध : मुख्यमंत्री

'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला आपला विरोध असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

Oct 25, 2016, 02:19 PM IST

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका : मुख्यमंत्री

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते येथील प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. 

Oct 20, 2016, 11:45 PM IST

राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात आगमन झालं. 

Sep 5, 2016, 02:20 PM IST