crime news

अंत्यविधीआधी शंका आली अन् पोलिसांनी घरी नेला मृतदेह; शवविच्छेदनातून समोर आलं सत्य

Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका महिलेची अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

Feb 18, 2024, 03:46 PM IST

वाशिम : जेवणाच्या ताटावरच मित्राने केली मित्राची हत्या; मानेवर थेट...

Washim Crime News : वाशिममध्ये एका मित्रानेच दुसऱ्या मित्राची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जेवत असतानाच मित्राने कुऱ्हाडीने मानेवर वार करुन मित्राची हत्या केली आहे.

Feb 18, 2024, 12:03 PM IST

नाव्हा शेवामध्ये 11 कोटींचे चिनी फटाके जप्त; 'या' कारणामुळे भारतात आहे बंदी

Navi Mumbai News : नवी मुंबईत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई करत सुमारे 11 कोटी रुपयांचे चिनी फटाके जप्त केले आहेत. एका कंटेनरमधून हे फटाके आणण्यात आले होते.

Feb 18, 2024, 10:23 AM IST

मामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा

मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. 

 

Feb 17, 2024, 11:04 AM IST

मुंबई : विमान कंपनीकडून वृद्ध दाम्पत्याला मिळाली नाही व्हीलचेअर; पत्नीसमोरच पतीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वृद्ध व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत न्यूयॉर्कवरुन मुंबईत आली होती.

Feb 16, 2024, 03:16 PM IST

VIDEO: नवरदेवाला लग्नात मिळालं 1.25 किलो सोने, मर्सिडीज कार अन् 1 कोटी रुपये रोख; पाहुणे पाहतच बसले

Viral Video : नोएडात पार पडलेला शाही विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या हायप्रोफाईल लग्नात मुलाला मर्सिडीज आणि फॉर्च्युनर कार, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी ते सुमारे 1.5 कोटी रुपये रोख असा हुंडा देण्यात आला होता. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 16, 2024, 01:38 PM IST

तक्रार केल्याच्या रागात फेरीवाल्यांकडून हॉटेल मालकावर हल्ला; मुंबईत 'या' स्टेशनबाहेर धक्कादायक प्रकार

Mumbai News Today: मुंबईत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांनी एका हॉटेल मालकाने तक्रार केल्याने त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Feb 16, 2024, 11:06 AM IST

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी एनआयएने नऊ ठिकाणी छापे ठाकले होते. यावेळी आयसिसच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. तपासात या व्यक्तीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Feb 16, 2024, 10:23 AM IST

तुमची मुलं सुरक्षित आहेत ना? मन विचलित करणारी आणि चिंता वाढवणारी बातमी

Thane Crime News : ठाण्यात वर्षभरात बालकांवरील अत्याच्यारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीवरुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Feb 16, 2024, 08:57 AM IST

नवी मुंबईत शरद मोहोळ टोळीच्या गुंडाची हत्या; पत्नीवरही केला जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील नेरुळ गावात राहणाऱ्या एका व्यक्तीची डोक्यात वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Feb 14, 2024, 03:45 PM IST

AIMIM नेत्याची गोळ्या झाडून हत्या; ओवेसी म्हणाले, 'आमच्या नेत्यांना का टार्गेट केलं जातं?'

Bihar Crime News : बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यात सोमवारी रात्री एआयएमआयएमचे राज्य सचिव अब्दुल सलाम उर्फ ​​अस्लम मुखिया यांची गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. तुर्कहा पुलाजवळ दुचाकीस्वार गुन्हेगारांनी त्यांची हत्या केली.

Feb 13, 2024, 04:48 PM IST

प्रणव मुखर्जींच्या मुलीचा ऑनलाइन छळ! राहुल गांधींना म्हणाल्या, 'माझ्या चारित्र्यावर...'

Sharmishtha Mukherjee : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेसच्या माजी नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस समर्थकांकडून त्यांना ट्रोल केले जात असल्याची तक्रार केली आहे

Feb 11, 2024, 12:52 PM IST

'राजकीय दबावाशिवाय 48 तास पोलिसांना द्या'; मनसे नेत्या शर्मिला ठाकरेंचे विधान

Sharmila Thackeray : गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात झालेल्या तीन खळबळजनक आणि हायप्रोफाईल हत्यांमुळे राजकारण तापलं आहे. यावर बोलताना मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना 48 तास ते कायदा सुव्यवस्था सरळ करतील असे म्हटलं आहे.

Feb 11, 2024, 12:16 PM IST

नागपुरात एकाच आठवड्यात सात हत्या; गेल्या 48 तासांत तिघांचा मृत्यू

Nagpur Crime News : नागपुरात हत्यांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांत नागपुरात तीन हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 11, 2024, 10:09 AM IST