'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य

Sanjay Shirsat on Eknath Shinde : महायुतीचा शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नावं गुलदस्त्यात आहे. शिवाय खातेवाटपाबद्दलही निर्णय झालेला नाही. अशातच गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. 

नेहा चौधरी | Updated: Dec 2, 2024, 12:55 PM IST
'हे सोयीचं असतं...'; गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपदावरुन संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य title=

Sanjay Shirsat on Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशानंतर महायुतीचा शपथविधी येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानाता होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी भव्य नियोजन करण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. खात्रीदायक सूत्रांनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या गळात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे, असं सांगण्यात येत आहे. महायुतीला बहुमत मिळून आठवडला लोटला, मात्र खातेवाटपावरून निर्माण झालेला तिढा अद्यापही कायम आहे. त्यात अजून खातेवाटपाचा निर्णय झालेला नसून महायुतीच्या बैठकीत तिन्ही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केलाय. त्यासोबत शिरसाट यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीबाबत मोठं वक्तव्य केलंय. (Sanjay Shirsat big statement from home minister and deputy chief minister )

 'हे सोयीचं असतं...'

गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्रीपद हे शिवसेनेकडे असावे यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही दिसत आहे. याबद्दल अनेक वेळा शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्टही केली आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असले तर गृहमंत्रीपद आमच्याकडे असावे, हा नैसर्गिक नियम आहे. ते खातं आमच्याकडे असायला हरकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. सोमवारी (2 डिसेंबर) ला झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी मुख्यमंत्रिपद भाजपकडे, तर गृहमंत्रिपद आम्हाला मागितलं, असं सांगितलंय. उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रिपद असतं त्यामुळे गृहमंत्रिपद आमच्याकडे असणं सोयीचं असेल, असं शिरसाट म्हणाले. तिन्ही नेत्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असं संजय शिरसाटांनी म्हटलंय. 

सत्तास्थापनेच्या धर्तीवर शिंदेंना त्यांचा निर्णय घ्यायचा जो आज- उद्यापर्यंत हा घेतला जाऊ शकतो, असं वक्तव्य करत मुख्यमंत्रीपदासंदर्भात तिन्ही नेत्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल ते सर्वांना मान्य असेल असं संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेदरम्यान म्हटलं. खातेवाटप हा एका प्रक्रियेचा भाग असल्याचं ते म्हणाले. 

पणदुसरीकडे गृहखात्यावरून भाजप, शिवसेनेत रस्सीखेच कायम आहे. गृहखातं मिळावं, यावर शिवसेना ठाम आहे मात्र भाजप गृहखातं सोडायला तयार नसल्याची माहिती मिळतेय. लवकरच महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार. महायुतीच्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार. या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.