konkan

Electric Bike : 35 हजार रुपयात इलेक्ट्रिक बाईक, मराठी मुलांची गगनभरारी

Electric Bike : सिंधुदुर्गातील दोन तरुणांनी कमाल केली आहे. भंगारात टाकलेले दुचाकींचे पार्ट आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य बाजारातून खरेदी करुन दोन महिन्याच्या कालावधीत इलेक्ट्रिक दुचाकी बनविली आहे. ही दुचाकी एकदा चार्ज केली की तीन तासात तब्बल 50 ते 55 किलोमीटरपर्यंत धावू शकते.  

May 18, 2023, 11:09 AM IST
Konkan Production less of Hapus Mango PT39S

कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राजकीय धुमशान

Uddhav Thackeray and Narayan Rane Visit to Barsu  : राजापूर येथील बारसू रिफायनरी ( Barsu Refinery Project )  विरोधकांची भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूत जाणार आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोर्चा काढणार आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापणार आहे.

May 6, 2023, 07:54 AM IST

Barsu Refinery : बारसू आंदोलन तीन दिवस स्थगित, आंदोलकांची मोठी घोषणा, पाहा Live Video

बारसूतल्या रिफायनरीसाठी शेतक-यांवर जबरदस्ती करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय. विरोध करणा-यांशीही चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊ असं आश्वासन शिंदेंनी दिलंय. तसंच आंदोलकांवर लाठीमार केलेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

Apr 28, 2023, 04:55 PM IST

रिफायनरी विरोधातील आंदोलन आक्रमक भूमिकेत, सर्वेक्षण ठिकाणी विरोधकांची कुच, पाहा Live Video

बारसूत रिफायनरीला विरोध असलेल्या आंदोलकांची पोलिसांशी झटापट....पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये अनेक जखमी...आंदोलकांचा आरोप...तर कुठलाही अन्याय, अत्याचार होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Apr 28, 2023, 04:11 PM IST

उद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून

Barsu Refinery :  राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.  

Apr 28, 2023, 07:55 AM IST

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, नागपुरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

Maharashtra Unseasonal Rain  :  नागपुरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने भिंत कोसळून मायलेकाचा मृत्यू झाला. ढिगाराखाली दबून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, येत्या दोन दिवसात म्हणजेच 22 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता आहे. येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

Apr 21, 2023, 08:44 AM IST

Rain in Maharashtra : पावसाबाबत मोठी बातमी, पुढचे 4 दिवस 'या' ठिकाणी जोरदार पाऊस

Rain in Maharashtra :  आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढेल, अशी शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट तर 16 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Apr 13, 2023, 11:19 AM IST

Maharashtra Weather Updates : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

Maharashtra Weather Updates : राज्यात पुढचे तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे.

Apr 8, 2023, 07:40 AM IST