maharashtra news

भांडुपमध्ये 'या' कारणामुळे तरुणाला अर्धनग्न करुन मारहाण, व्हिडीओ शूट केले व्हायरल

Bhandup Crime: भांडुपमध्ये एका तरुणाची अर्ध नग्न अवस्थेत धिंड काढून त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. भांडुपच्या रमाबाई नगर परिसरातील ही घटना आहे.

Oct 8, 2023, 08:03 AM IST

रांगड्या कोल्हापूरचा तरुण ठरला 'मिस्टर गे इंडिया'; साऊथ आफ्रिकेत करणार भारताचं प्रतिनिधित्व

Kolhapur News : लैंगिक अल्पसंख्याक म्हणजेच समलिंगी अथवा तृतीयपंथी लोकांकडे तुच्छतेने पाहिले जाते, अशी खंत देखील विशाल पिंजानी यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे आता विशाल पिंजानी जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करणार आहे.

Oct 7, 2023, 04:07 PM IST

नवी मुंबई पोलिसांच्या तावडीमधून नायजेरियन ड्रग्ज तस्कर पळाला; धक्कादायक Video Viral

Navi Mumbai Crime : मुंबईसह आसपासच्या परिसरात ड्रग्ज तस्कर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. नवी मुंबईतही नायजेरियन नागरिकांकडून ड्रग्जची विक्री करण्यात येत आहे. अशातच नवी मुंबई पोलिसांच्या हातून एक नायजेरियन ड्रग्ज तस्कर पळून गेल्याचे समोर आलं आहे.

Oct 7, 2023, 01:08 PM IST

काड्यांपासून सुरुवात, सोशल मीडियापासून अलिप्त अन्...; ओजस देवतळेला आशियाई स्पर्धेत तीन गोल्ड मेडल्स

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेमध्ये नागपुरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड नेमबाजी या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. ओजसनं आशियाई स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदके मिळवत इतिहास घडवला आहे. 

Oct 7, 2023, 12:16 PM IST

महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची संधी

Nagpur Mahavitaran Job: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये वीजतंत्रीची 13 पदे, तारतंत्रीची 13 पदे, कोपाची 8 पदे भरली जाणार आहेत.

Oct 7, 2023, 11:41 AM IST

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' परिसरात 9 आणि 13 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

Mumbai Water Cut : मालाड टेकडी जलाशयातील इनलेट आणि आउटलेटवरील दहा झडपा नव्याने बसवण्यात येणार असल्याने मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. हे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये 9 आणि 13 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

Oct 7, 2023, 11:17 AM IST

नितीन गडकरींना मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथाचा प्रताप; कारागृहात खाल्लं लोखंड

Nitin Gadkari Threatening Case : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये जयेश कांथा या कुख्यात गुंडाने फोन केला होता. त्यामुळे सध्या त्याला नागपुरातील कारागृहात आणण्यात आलं आहे. मात्र कारागृहात त्याने मोठा गोंधळ घातला आहे.

Oct 7, 2023, 09:58 AM IST

पितृ पक्षात 'हे' 6 पदार्थ चुकूनही खाऊ नये

अरबी हे जमिनीच्या आत उगवते. हेदेखील पितृपक्षात वर्ज मानले जाते. पितृपक्षात बटाटे खाऊ नयेत. तसेच श्राद्धाच्या जेवणातही याची भाजी देऊ नये असे म्हणतात. कांदा आणि लसूण तामसिक मानले जाते. त्यामुळे हे खाणेदेखील वर्ज्य मानले जाते. श्राद्धादरम्यान मसूरची डाळ सेवन केल्यास पितृदोष लागतो. पितृपक्षात चणे आणि चण्यापासून बनलेले पदार्थ खाणे अशुभ मानले जाते. 

Oct 6, 2023, 06:35 PM IST

वर्ल्ड कपमध्ये 'या' बॅटर्सना शुन्यावर आऊट करणे कोणालाच नाही जमले

World Cup 2023 Record: वर्ल्ड कपमध्ये विवियन रिचर्ड यांनी शुन्यावर कधीच बाद न होता, 1013 रन्स बनवले आहेत.डेव्हिड वॉर्नरने वर्ल्ड कपमध्ये 992 रन्स बनवले. दरवेळेस तो आपले खाते उघडतो. या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन कधीच शुन्यावर आऊट झाला नाही. त्याने वर्ल्ड कपमध्ये 987 रन्स बनवले. या लिस्टमधील कोहली आणि वॉर्नर आजही खेळत आहेत. सर्वात कमी वयाचा असल्याने कोहलीला रेकॉर्ड्स बनविण्याची संधी आहे. 

Oct 6, 2023, 06:01 PM IST

मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज केले जप्त

Nashik Drugs Seized: गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्ज सापडण्याचं सत्र सुरूच आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

Oct 6, 2023, 05:33 PM IST

पत्नीसह वकिलाची हत्या करून कांदिवलीच्या नाल्यात फेकले; सुपारी किलर पलटल्याने झाला होता उलगडा

Mumbai Crime : हेमा उपाध्यय आणि वकील हरेश भंभानी यांच्या आठ वर्षापूर्वी झालेल्या हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. सत्र न्यायालयाने आता या प्रकरणात पती चिंतन उपाध्याय याला दोषी ठरवलं आहे. शनिवारी चिंतन उपाध्याय यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.

Oct 6, 2023, 04:03 PM IST