maharashtra

KEM रुग्णालयाच्या चुकीची शिक्षा 52 दिवसांच्या बाळाला, 'हात गेला बाळ तरी सुखरूप द्या' पालकांचा टाहो

मुंबईतल्या प्रसिद्ध के ई  एम रुग्णालय प्रशासनाच्या एका चुकीची शिक्षा 52 दिवसांच्या बाळाला सहन करावी लागलीय. बाळाचा हात कोपऱ्यापासून कापावा लागला. या घटनेने एकच खळबल उडाली असून रुग्णालय प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Aug 12, 2023, 05:13 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक घटना, कार चालकाने 7 वर्षांच्या मुलाला नेलं फरफटत... मुलाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका मद्यापी कार चालकाने सात वर्षांच्या मुलाला कारने सातशे ते आठशे मीटर फरफटत नेलं. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला.  अपघातानंतर परिसरात संतापाचा वातावरण होतं. नागरिकांनी मद्यपी चालकाला पकडून चोप दिला.

Aug 11, 2023, 06:55 PM IST

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, अजित पवारांच्या गळाला बीडचा दुसरा पुतण्या?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर बीडमधला आणखी एक पुतण्या अजित पवार गटात सहभागी होणयाची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असंही बोललं जात आहे. 

Aug 11, 2023, 05:13 PM IST

ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?

Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे. 

Aug 11, 2023, 02:21 PM IST

15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी

Independence Day:  राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Aug 11, 2023, 10:50 AM IST

घर घेताय, सावधान! वसई-विरामध्ये मोठा हाऊसिंग घोटाळा उघडकीस, अशी होते फसवणूक

घरं घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. विरारमध्ये मोठा हाऊसिंग घोटाळा उघड झालाय. बोगस कागदपत्रांच्या आधारे घरं घेणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जातेय, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

Aug 10, 2023, 08:48 PM IST

शिक्षण क्षेत्रातल्या आणखी एका मोठा घोटाळ्याचा पर्दाफाश, पॅथोलॉजी लॅबसाठी चक्क बोगस प्रमणापत्रांचं वाटप

राज्यात शिक्षण क्षेत्रातले घोटाळे कमी होताना दिसत आहेत. नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली. तर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेतशिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचं रेट कार्डचं वाचून दाखवलं. आता शिक्षण क्षेत्रातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. 

Aug 10, 2023, 04:27 PM IST

हेराफेरी! फोटो एडिट करुन झाला जिल्हाधिकारी, गोंदियातील तरुणाचे 'मुन्नाभाई'मधल्या लकी सिंगसारखे प्रताप

मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबरचे स्वत:चे फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत होता. इतकंच नाही तर जिल्हाधिकारी बनल्याचे फोटोही त्याने शेअर केले. त्यामुळे समाजात त्या तरुणाविषयी आदर वाढला होता. पण प्रत्यक्षात प्रकार काही वेगळाच होता. जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

Aug 10, 2023, 02:17 PM IST

यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख

Who Is Kalavati Bandurkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना महाराष्ट्रातील या महिलेचा उल्लेख थेट अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केला. अमित शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना ज्या महिलेचं नाव घेतलं ती आहे तरी कोण आणि त्या अचानक चर्चेत का आलेल्या पाहूयात.

Aug 10, 2023, 09:14 AM IST

पीक विम्यात भ्रष्टाचाराच सेतू! नाव शेतकऱ्याचं, बँक खातं सेतू चालकाचं... पाहा कसं लुबाडलं जातंय

पीक विमाच्या नावानं शेतकऱ्यांना लुबाडलं जातंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विमा योजना लागू करण्यात आलीय. मात्र सेतू चालक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पीक विम्यातला भ्रष्टाचाराचा सेतू ठरलेल्या या केंद्रांचा भांडाफोड करणारा हा रिपोर्ट.... 

Aug 9, 2023, 09:57 PM IST

पाणी प्रश्न पुन्हा पेटणार, जतमधील गावं कर्नाटकात समाविष्ट होणार.. राज्य सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम

आता एनओसी नाही,थेट कर्नाटक मध्ये जाण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करणार असल्याचा इशारा जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी दिला आहे. पाणी संघर्ष समितीचा राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. 

 

Aug 9, 2023, 02:58 PM IST

दराडेबाईंचा दरोडा! नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

नोकरीचं आमिष दाखवून अनेक तरूणांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी भावाच्या मदतीनं 44 जणांना 5 कोटींचा गंडा घातल्याचा आरोप होतोय. दराडेंना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

Aug 8, 2023, 07:35 PM IST

Garuda Purana: मृत्यू जवळ आल्यास व्यक्तीला दिसतात 'हे' संकेत

प्रत्येकाला आपल्या जन्म मृत्यूबद्दल ऐकायला आवडते. गरुड पुराणानुसार माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचे फळ या जन्मात तर काहींना मृत्यूनंतरही भोगावे लागते. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याच्या आधी काही संकेत मिळू लागतात. गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा श्वास उलटा चालतो. व्यक्तीला त्याच्या आजूबाजूचे लोक दिसत नाहीत. मृत्यूपूर्वी माणसाच्या हातावरील रेषा खूप हलक्या होतात. काही लोकांच्या रेषा तर पूर्ण पणे दिसणे बंद होते.  

Aug 8, 2023, 05:14 PM IST

आरोग्यकेंद्रात डॉक्टर नाही, शासकीय रुग्णवाहिकेत डिझेल नाही... कोपरगावात गरोदर महिलेचा मृत्यू

कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय. रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकिकडे गतिमान सरकारच्या गोष्टी होत असताना ग्रामीण भागात मुलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. 

 

Aug 8, 2023, 02:35 PM IST