Independence Day: 15 ऑगस्टला आपण देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. यावेळी महाराष्ट्रासह देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडेल.यावेळी देशभक्तीपर गीते, भाषण ऐकायला मिळेल. दरम्यान महाराष्ट्र सरकारकडूनही यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे नियोजन पूर्ण झाले आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टला कोण कुठे ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे. असे असताना काही ठिकाणी पालकमंत्र्यांऐवजी राज्याचे मंत्रीच ध्वजारोहण करणार आहेत. त्यावरुन नवा वाद सुरु होण्याची चिन्हं आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार थेट कोल्हापुरात ध्वजारोहण करतील तर पुण्यात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करतील. रायगडमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. स्वातंत्र्यदिनी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री ध्वजारोहम करतात. पण राज्यातील पालकमंत्र्यांची यादी अद्याप समोर आलेली नाही. त्यात राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडण्याची शक्यता आहे. कारण अनेक नेत्यांनी पालक मंत्री पदावर आधीच दावा ठोकला आहे. असा वाद होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे - पालघर
जिल्हाधिकारी रायगड - रायगड
जिल्हाधिकारी हिंगोली - हिंगोली
जिल्हाधिकारी वर्धा - वर्धा
जिल्हाधिकारी गोंदिया - गोंदिया
जिल्हाधिकारी भंडारा - भंडारा
जिल्हाधिकारी अकोला - अकोला
जिल्हाधिकारी नांदेड - नांदेड
भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 'ही' घ्या अर्जाची लिंक