mla

मनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी

राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. 

Jul 6, 2014, 07:43 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरे गटबाजी कशी रोखणार?

राज्यात मनसेची पायाभरणी करणा-या नाशिकमध्ये सध्या दुफळी निर्माण झालीय. स्थायी समितीच्या सभापतीपदावरून प्रदेश सरचिटणीस वसंत गिते सध्या नाराज आहेत. 

Jul 6, 2014, 05:15 PM IST

शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्याविरोधात गुन्हा

शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jul 3, 2014, 04:58 PM IST

विश्वासघात : नागरिकांच्या पैशांवर आमदारांची उधळपट्टी!

जनतेच्या पैशाचा अपव्यय म्हणून रद्द झालेला गोव्याच्या आमदाराचा ब्राझील दौरा जनतेच्या पैशातूनच पूर्ण होताना दिसतोय. या शिष्टमंडळाचा भाग असणाऱ्या एका मंत्र्यांसह चार आमदारांची एक टीम गुरुवारी ब्राझीलला रवाना झालीय. 

Jul 2, 2014, 10:16 PM IST

शिवसेनेच्या सर्व आमदारांचं तिकीट कन्फर्म

शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना विधानसभेचं तिकीट पुन्हा दिलं जाणार आहे, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.

Jun 30, 2014, 11:12 PM IST

नारायण राणेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वाढला दबाव

राज्यातील मुख्यमंत्री बदलाचे वारे जोरात वाहत असातानाच उदयोग मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काँग्रेसमध्ये एक दबाव गट तयार झालाय. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी एक आक्रमक नेतृत्वाची गरज आहे, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.

Jun 20, 2014, 08:06 PM IST

दिल्लीत भाजप खासदाराला फोनवर धमकी, 25 लाखांची मागणी

दिल्लीतल्या त्रिनगर विधानसभा क्षेत्रातले भाजपचे खासदार डॉ. नंदकिशोर गर्ग यांना फोनवरून खंडणी वसुलीसाठी धमकी मिळाल्याचं पुढं आलंय. डॉक्टर नंदकिशोर आणि त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मागणी आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी मिळालीय.

Jun 1, 2014, 08:44 AM IST

ऐतिहासिक... मृत्यूनंतरही या उमेदवारानं मिळवला विजय!

देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आंध्रप्रदेश विधानसभेचेही निकाल जाहीर झाले.

May 17, 2014, 10:43 PM IST

ऐतिहासिक... मृत्यूनंतरही उमेदवार होणार विजयी?

लोकसभा निवडणुकीत एखाद्या व्यक्तीच्या नावावर मृत्यूनंतरही मतदान झालं तर... नाही नाही हा ‘भूतनाथ’ किंवा कल्पित घटना नाही तर सत्य घटना आहे...

May 5, 2014, 10:45 AM IST

मनसेचे आमदार राम कदम फरार

महाराष्ट्र निर्माण सेनेचे आमदार राम कदम यांना गौतम बुद्धांच्या अस्थी प्रकरण चांगलेच भोवलं आहे. आमदार राम कदम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

Apr 24, 2014, 07:36 AM IST

दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी

कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.

Apr 13, 2014, 01:40 PM IST

१० वर्षात एकाही आमदार, खासदाराविरुद्ध खटला नाही?

गेली दहा वर्षे राज्यातील एकाही आमदार किंवा खासदाराच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्षांकडे पोलीसांनी मागितली नाहीये. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आमदार-खासदार य़ांच्यावरील गुन्ह्याचं काय असा सवाल आता उपस्थित झालाय.

Mar 17, 2014, 10:10 AM IST

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना पत्नीसह अटक

इन्कम टॅक्सच्या बनावट दाखल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांना शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यानंतर कोर्टानं त्यांची २० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केलीय.

Dec 13, 2013, 09:20 PM IST