'शेतकरी दादा' तुम्ही ही माहिती तलाठ्याला दिलीय का?
दुष्काळ आणि गारपीट याची मदत सरकारकडून प्रभावित शेतकऱ्यांना पाठवण्यात आली, पण अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही, अनेकवेळा ही मदत येऊनही शेतकऱ्यांना कळत नाही, दुसऱ्याच्या नावाने मदत हडपण्याचे प्रकारही घडतात, म्हणून सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्याचं ठरवलं आहे.
Apr 1, 2015, 01:51 PM ISTराष्ट्रीयीकृत बँकेत खाती नसलेले शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित
दुष्काळ आणि गारपीटीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून थोडीशी का असेना, मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण यात एक मोठं वास्तव समोर आलं आहे, अनेक शेतकऱ्यांकडे राष्ट्रीयीकृत बँकेचे अकाऊंट नसल्याने त्यांचे पैसे सरकारच्या तिजोरीत परत गेले आहेत, महाराष्ट्रात एकूण ४६० कोटी रूपये सरकारच्या तिजोरीत परत गेले आहेत.
Apr 1, 2015, 12:55 PM IST