raj thackeray

मोदींकडून सरकारी यंत्रणेचा वापर, निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष - राज ठाकरे

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी सरकारी यंत्रणेचा वापर भाजप या राजकीय पक्षासाठी होत आहे, असा आक्षेप घेत निवडणूक आयोग का दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी जाहीर सभेत विचारला.

Oct 9, 2014, 09:31 AM IST

राज यांचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे पुन्हा संकेत

शहरात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे संकेत दिले आहेत. वेळ आली तर मी सरकारचा कारभार मागे उभा राहून हाकणार नाही, तर आत येऊन हाकेन, असं त्यांनी जाहीर सभेत म्हटलं आहे.

Oct 8, 2014, 08:19 PM IST

गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे

गरज पडल्यास महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी आणि उद्धव एकत्र येऊ असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सेना मनसेच्या संभाव्य समिकरणांचे संकेत दिले आहेत. आमचं आम्ही पाहून घेऊ, त्याची चिंता इतरांनी करण्याची गरज नाही असाही ठाकरी शैलीत राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फटकेबाजी केली. 

Oct 8, 2014, 08:18 PM IST

...उद्धव जेव्हा फोन करतो तेव्हा - राज ठाकरे

...उद्धव जेव्हा फोन करतो तेव्हा - राज ठाकरे

Oct 8, 2014, 07:12 PM IST

हा तर पोस्टरबॉय! राज ठाकरेंची तावडेंवर टीका

विनोद तावडे हे भाजपचे पोस्टर बॉय असल्याची झोंबरी टीका तावडेंचं नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. चारकोप इथल्या सभेत बोलतांना त्यांनी तावडेंची खिल्ली देखील उडवली.

Oct 8, 2014, 07:11 AM IST

अखंड महाराष्ट्राबाबत मोदींवर विश्वास कसा ठेवणार? - राज ठाकरे

अखंड महाराष्ट्राबाबत मोदींच्या वक्तव्यावर विश्वास कसा ठेवणार, अशी प्रतिक्रिया राज ठाकरें यांनी दिली आहे. बडोद्यात मराठी समरस झाले असताना मुंबईत गुजरातींना वेगळ्या अस्मितेची गरजच काय? रोखठोक सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.

Oct 7, 2014, 01:59 PM IST