raj thackeray

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय झालेत. राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या राज ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातलाय. 

Oct 29, 2014, 09:49 PM IST

भाजप नेते भेटलेत, आदेश राज यांचाच असणार - मनसे आमदार

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षातील कोणते आमदार गळाला लागतात याची चाचपणी सुरु झाली आहे. याचाच एकभाग म्हणून मनसेचा एकच आमदार निवडून आला. या आमदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. मात्र, आपण पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानणार आहोत. मी मनसेत राहणार असल्याचे मनसे आमदार शरद सोनावणे यांनी स्पष्ट केलेय.

Oct 21, 2014, 09:52 AM IST

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची तंबी

महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या हातात सत्ता द्या. सत्तेत आल्यानंतर  केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही, असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठेवला आहे. 

Oct 21, 2014, 08:35 AM IST

मनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे. 

Oct 20, 2014, 09:39 PM IST

सोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे'

विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हातात अवघी एक जागा लागल्याने, सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली जात आहे.ब्लू प्रिन्ट विकणे आहे अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या फिरतायत. राज ठाकरे यांनी पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या, सभांनाही खूप प्रतिसाद मिळाला होता. 

Oct 20, 2014, 07:04 PM IST

कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता – राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे खुलासा केलाय. परप्रांतियांविरूद्धच्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगानं राज ठाकरेंवर नोटीस बजावली होती. 

Oct 18, 2014, 09:16 AM IST

गूगल ट्रेंड: ऑनलाइन सर्चमध्ये राज ठाकरे अव्वल

महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ऑनलाइन जगतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय राजकीय नेते ठरले आहेत. विशेष म्हणजे भाजपनं सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिला असूनही या ऑनलाइन युद्धात राज ठाकरेंनी भाजपवरही मात केली आहे. 

Oct 15, 2014, 02:20 PM IST

'मनसे यापुढे लोकसभा लढवणार नाही'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापुढे लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेला आतापर्यंत लोकसभेत यश मिळालेलं नाही, हे या मागचं कारण नक्कीच नाही. कारण राज ठाकरे यांनी या मुद्यावर मत माडलं आहे.

Oct 14, 2014, 12:14 PM IST

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

परप्रांतियांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 

Oct 13, 2014, 09:32 PM IST

मनसे पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही – राज

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विधानसभा प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला, त्यात राज ठाकरेंनी ही घोषणा केली. राष्टीय पक्षांनी लोकसभा निवडणूक लढवावी, विधानसभा निवडणूक त्यांनी लढवू नये असं मतही राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं. 

Oct 13, 2014, 04:15 PM IST