raj thackeray

'पराभवातून खूप शिकलो' - राज ठाकरे

"वाटतंय ना, जमिनीवर आलो", असं राज ठाकरेंनी म्हटलं आणि एवढ्यावरच न थांबता, राज ठाकरे पुढे म्हणाले, "पराभवातून खूप शिकलो. जे झालं ते मी सोडून दिले. चिखल किती चिवडायचा! जी काही मीमांसा केली, त्यातून जो बोध घेतला तो 'बोध' बोलण्याचा नव्हे, तर कृतीचा विषय आहे. त्यानुसार कृती सुरू केली आहे". अशी मनमोकळी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये दिली.

Nov 30, 2014, 07:04 PM IST

मराठी सक्तीची नेमाडेंची भूमिका योग्यच - राज ठाकरे

 शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, ही ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

Nov 29, 2014, 04:41 PM IST

राज ठाकरे पुन्हा दौऱ्यावर, नजरा नाशिककडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवसीय नाशिक दौ-यावर आहेत. दौ-याच्या सुरुवातीला त्यांनी अर्चना जाधव या नगरसेविकेच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं.

Nov 28, 2014, 07:43 PM IST

राज्यात कुणाची सत्ता हेच कळत नाही : राज ठाकरे

राज्यात कुणाची सत्ता आहे, हे अजूनही मला समजलेले नाही, तुम्हाला समजलं तर नक्की मला ही सांगा, असं राज ठाकरे यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना म्हटलं आहे. 

Nov 26, 2014, 01:05 PM IST

बेकायदा होर्डिंग्जबाबत न्यायालयाकडून कानउघडणी, राज ठाकरेंची प्रशंसा

शहरं विद्रूप करणा-या बेकायदा होर्डिंग्जबाबत मुंबई न्यायालयाने सर्व पालिका-महापालिकांना निर्वाणीचा इशारा दिलाय. होर्डिंग्जबाबत ऑगस्टमध्ये दिलेल्या आदेशाचं पालन करा, अन्यथा पालिका बरखास्त करण्याचे आदेश राज्य सरकारला देऊ अशा शब्दांत  न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची कानउघडणी केली. दरम्यान, राज ठाकरे यांचे  न्यायालयाने कौतुक केले आहे.

Nov 25, 2014, 12:46 PM IST

राज म्हणतायत, या मला आपलं ऐकायचंय!

राज म्हणतायत, या मला आपलं ऐकायचंय!

Nov 19, 2014, 09:39 PM IST