सचिनच्या मनातील क्रिकेट कसे काढणार? - अंजली
वानखेडे स्टेडियमवरील फॅन्सचं प्रेम पाहून मास्टर ब्लास्टर सचिनही भारावला. त्याच्या डोळ्यातही अश्रू तरळले.. तर सचिनची पत्नी अंजलीलासुद्धा भावना आवरणं कठीण झालं होतं. सचिनविना क्रिकेट शक्य आहे. मात्र क्रिकेटविना सचिन ही कल्पना करुच शकत नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया तिनं दिलीय.
Nov 16, 2013, 02:42 PM ISTटीम इंडियाचा सचिनला विजयी निरोप, डावाने विजयासह मालिका २-० ने खिशात
टीम इंडियाच्या सामीने शेवटची विकेट काढली आणि वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश मिळाला. भारताने कसोटी मालिका जिंकली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी १ डाव आणि १२६ धावांनी जिंकत ही मालिका २-० अशी जिंकत सचिनला विजयी निरोप दिला. मालिका जिंकल्याचा उत्साह दिसून आला नाही तर सचिनच्या निरोपासाठी भावून झालेल्या प्रेक्षकांचा दिसला.
Nov 16, 2013, 02:04 PM ISTसचिन तेंडुलकरला द्या, खास शुभेच्छापर प्रतिक्रिया...
मुंबईचा लाडका सचिन. क्रिकेटचा देव. मास्टर. मास्टर ब्लास्टर. बॉलरचा कर्दनकाळ. अनेक विक्रम आपल्या पायाजवळ आणले. सचिनची २००वी कसोटी. तीही शेवटची. पुन्हा सचिन आपल्याला मैदानावर दिसणार नाही. त्याला निरोप देताना चाहते भावूक झाले.
Nov 16, 2013, 12:32 PM ISTटीम जिंकली...पण सचिनच्या डोळ्यात पाणी
तिसऱ्या दिवशी पहिली विकेट ख्रिस गेलची विकेट पडली त्याचवेळी वेस्ट इंडिजचा पराभव दिसून आला. त्यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी कमाल करीत विंडिजला धक्क्यावर धक्के दिले. शेवटची विकेट सामीने काढली आणि सचिन तेंडुलकरने हातात स्टंप घेऊन दोन्ही हात उंच पसरवून वानखेडेवरील त्याच्या चाहत्यांना सामोरा गेला खरा. पण सचिनच्या डोळ्यात अश्रु दाटलेच. त्यामुळे स्टेडियमवर सन्नाटा पसरला.
Nov 16, 2013, 12:08 PM ISTसचिनची निवृत्ती, अन् पूनम पांडेचं भांडवल
नेहमी आपल्या विचित्र वक्तव्य, विचित्र फोटो यांच्यामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने पुन्हा सचिनच्या निवृत्तीचं भांडवल केलं आहं. पूनम पांडेने आपल्या हातावर सचिनचा टॅटू काढून घेतला आहे.
Nov 15, 2013, 06:08 PM ISTरोहितचे लागोपाठ दोन शतकं
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये द्विशतकीय खेळी केल्यानंतर लगोपाठ दोन सामन्यात दोन शतकं झळकावून रोहित शर्माने आपण करिअरच्या जबरदस्त फॉर्मात आहे हे दर्शविले आहे.
Nov 15, 2013, 05:21 PM ISTसचिन विश्व : एकिकडे क्रिकेटप्रेमींचा सलाम आणि दुसरीकडे निराशा
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आऊट झाल्यानंतर सेंच्युरी पाहायला न मिळाल्यानं सचिन चाहते निराशा झाले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर ७४ रन्सवर आऊट झाला. आपल्या अखेरच्या टेस्टमध्ये मास्टर इनिंग खेळून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी स्टेडियममधील क्रिकेटप्रेमींनी त्याला सलाम ठोकला. त्याच्या या इनिंगमध्ये १२ फोरचा समावेश होता.
Nov 15, 2013, 02:27 PM ISTसचिन तेंडुलकरची भूमिका अमिरला पडद्यावर साकारायचेय
क्रिकेट जगतचा देव असणारा सचिन सर्वांचाच लाडका आहे. त्याच्या फॅनलिस्टमध्ये छोट्या दोस्तांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांत अमूल्य योगदान देणारे महान कलाकार, नेते यांचाही सामावेश आहे. बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानही सचिनच्या चाहता आहे. त्याला मोठ्या पडद्यावर सचिनची भूमिका साकारायची आहे.
Nov 15, 2013, 01:00 PM ISTसचिन आऊट : मास्टर इनिंग झोकात, चाहते भावूक
मास्टर इनिंग सचिन तेंडुलकर याने शेवटच्या कसोटीत खेळली. १२ खणखणीत चौकार ठोकत ७४ धावा केल्या. त्यामुळे एकीकडे चाहते खूश असले तरी त्याच्या अखेरच्या कसोटीमुळे चाहते भावूक झालेत. वाडखेडेवरील चाहत्यांनी उभे राहून सचिनला मानवंदना दिली.
Nov 15, 2013, 11:24 AM ISTसचिनचा मैदानाबाहेरही अनोख्या विक्रम
क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम नोंदवणा-या सचिन तेंडुलकरच्या नावावर मैदानाबाहेरही एका अनोख्या विक्रमाची नोंद झालीय. भारतातल्या सर्व प्रकारच्या खेळांच्या खेळाडूंपैकी सर्वाधिक पुस्तकं ही सचिन तेंडुलकरवर लिहिली गेलीत. भारतातील अनेक भाषांमध्ये सचिनवरची पुस्तके प्रकाशित झालीत. शिवाय पाश्चिमात्य लेखकांवरही सचिननंच गारूड केलंय.
Nov 15, 2013, 09:02 AM ISTमुंबईच्या क्रिकेट पंढरीवर सचिन चाहत्यांची अलोट गर्दी
क्रिकेटच्या देवाचा खेळ याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी सगळ्यांची पावलं वळली होती ती मुंबईची क्रिकेट पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमकडं... सचिन तेंडुलकरसाठीही आजची खेळी स्पेशल, यादगार आणि अविस्मरणीय ठरली... कारण... पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...
Nov 15, 2013, 08:16 AM ISTटीम इंडियाच्या जर्सीवर... सचिन रमेश तेंडुलकर!
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत महान बॅट्समन सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ आपल्या पारंपरिक गणवेशाला फाटा देत चक्क सचिन रमेश तेंडुलकर २०० वी टेस्ट असं छापलेली जर्सी तयार केली आहे.
Nov 14, 2013, 10:35 PM ISTस्कोअरकार्ड : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, वानखेडे टेस्ट
भारत विरुद्ध वेस्ट इंडिजची वानखेडे टेस्ट मॅचला गुरुवारपासून सुरूवात झालीय. ही सचिनची २०० वी आणि अखेरची टेस्ट मॅच आहे... त्यामुळे या मॅचमध्ये सगळ्यांच्या नजरा खिळल्यात त्या एकट्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर...
Nov 14, 2013, 09:16 PM ISTसचिन `सेन्चुरी`कर होणार?
वानखेडेवर अखेरची २०० वी टेस्ट मॅच खेळणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दिवसअखेर ३८ धावांवर नाबाद खेळतोय. सचिनने कारकिर्दीतील शेवटच्या इनिंगमध्येही `सेंच्युरी`कर व्हावे, अशीच तमाम क्रिकेट रसिकांची इच्छा आहे. त्यामुळेच सचिनच्या या खेळीकडे आता जगाच्या नजरा खिळल्यात.
Nov 14, 2013, 09:06 PM ISTक्रिकेटच्या देवाच्या नावावर काळाबाजार, तिघांना अटक
वानखेडेवर होणाऱ्या सचिनच्या शेवटच्या मॅचसाठी तिकिटांचा काळाबाजार जोरात सुरू आहे. याचसंदर्भात धक्कादायक बाब उघड झालीय. गरवारे क्लबच्या झनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे गिरीश प्रेमना आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांना तिकिटाचा काळाबाजार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.
Nov 13, 2013, 11:05 PM IST