बाबांनी सांगितलंय, राजकारणात जाऊ नकोस! मग कसा जाणार? - सचिन
मध्य प्रदेश काँग्रेसने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवस काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, या वृत्ताबाबत तथ्य नसल्याचे सचिनच्या सूत्रांकडून स्पष्ट झाले होते. त्यानंतर सचिनने तसे स्पष्ट केल्याने मध्य प्रदेश काँग्रेसचा हा स्टंट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत सचिने म्हटलं आहे की, मी राजकारणापासून दूर रहावे, अशी माझ्या बाबांची इच्छा होती.
Oct 29, 2013, 02:54 PM ISTसचिनच्या अखेरच्या मॅचला सामान्य चाहते मुकणार?
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टची उत्सुकता शिगेला पोहलचली आहे. मात्र, सचिनची शेवटची टेस्ट पाहण्याची संधी सामान्य क्रिकेटप्रेमींना कमीच मिळणार आहे.
Oct 28, 2013, 07:23 PM IST१९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा सचिनवर वर्षाव!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या १९९व्या टेस्टमॅचसाठी ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर उतरेल. यावेळी १९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सचिनवर केला जाणार आहे. एवढंच नाही तर १९९ फुगे सुद्धा आकाशात सोडले जातील. सचिन मुंबईत २००वी मॅच खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.
Oct 28, 2013, 09:33 AM ISTअखेरच्या रणजीसाठी सचिन सज्ज, सर्वांच्या नजरा सचिनवर!
लाहलीत मुंबई विरुद्ध हरयाणा रणजी मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकत मुंबईचा कॅप्टन झहीर खाननं पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे सचिनची ही शेवटची रणजी मॅच आहे. शेवटच्या वेळी रणजीचं मैदान गाजवण्यासाठी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर सज्ज आहे.
Oct 27, 2013, 11:03 AM ISTसचिन तेंडुलकर करणार काँग्रेसचा प्रचार?
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे वृत्त मध्य प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आले आहे. दरम्यान, सचिनकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
Oct 26, 2013, 02:42 PM ISTसचिनचा शेवटचा `सामना` उद्धव जोशी सरांसोबत पाहणार?
सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीतील २०० वा आणि अखेरचा कसोटी सामना पाहाण्यासाठी शिवसेना नेते आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी हे देखील वानखेडेवर जाणार आहेत.
Oct 24, 2013, 07:07 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात `विस्डेन`चा तुरा
२००व्या टेस्टनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर होणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. क्रिकेटची गीता समजल्या जाणा-या विस्डेन मॅगझिनने जाहीर केलेल्या सार्वकालिक वर्ल्ड टेस्ट टीममध्ये सचिन तेंडुलकरची वर्णी लागली आहे.
Oct 24, 2013, 03:08 PM ISTसचिन तेंडुलकर विरुद्ध शिवसेना... जुनं नातं!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विक्रम हे नातं एकदम घट्ट आहे... फेविकॉलच्या मजबुत जोडसारखंच... अगदी त्याचप्रमाणं सचिन तेंडुलकर विरूद्ध शिवसेना हे समीकरणही गेल्या काही वर्षांत घट्ट रूजलंय. अगदी सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीच्या निमित्तानं या वादालाही नवे धुमारे फुटलेत...
Oct 23, 2013, 07:50 PM ISTसेनेला हवाय गावसकर.... सचिन नकोसा!
मुंबईतील कांदिवली संकुलाला सचिन तेंडुलकरचं नाव देण्याच्या प्रस्तावाला राजकीय वळण मिळालंय. सचिनचं नाव देण्याची घोषणा ‘एमसीए’ अध्यक्ष शरद पवार यांनी काल केली तर हा पालिकेचा भूखंड असल्यानं हा अधिकार महापालिकेचाच असल्याचं सत्ताधारी शिवसेनेनं सांगून प्रकरणाला नवं वळण दिलंय.
Oct 23, 2013, 06:38 PM ISTसचिन ‘वानखेडे’वरचं अपयश धुवून काढणार?
वानखेडे स्टेडियमशी सचिनचं नातं तसं जुनं आहे. याच वानखेडे स्टेडियमवर सचिनने अनेक नेत्रदिपक खेळीही केल्या आहेत.
Oct 22, 2013, 06:12 PM ISTसचिनच्या आईसाठी वानखेडेवर विशेष रॅम्प!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्टसाठी वानखेडेवर जोरदार तयारी सुरु आहे. सचिनची आई त्याची अखेरची टेस्ट पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असणार आहे.
Oct 22, 2013, 11:55 AM ISTसचिनच्या १९९व्या टेस्टसाठी बिग बी, शाहरूख येणार!
सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीचा क्षण जवळजवळ येऊन ठेपतोय. सचिनची २००वी अखेरची टेस्ट मुंबईत असणार आहे. पण त्याआधी १९९व्या टेस्टचा मान कोलकात्याच्या ईडन गार्डन्सला मिळालाय.
Oct 21, 2013, 10:52 AM ISTमंकीगेटचा खरा प्रकार माझ्या पुस्तकात वाचा- कुंबळे
2008मध्ये सिडनी टेस्टमध्ये झालेल्या मंकीगेट प्रकरणाबाबतची वस्तुस्थिती आपल्याला माझ्या पुस्तकात वाचायला मिळेल अस मत माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यानी व्यक्त केलय.
Oct 19, 2013, 06:21 PM ISTसचिन तेंडुलकर होईल महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर - मुख्यमंत्री
काँग्रेसकडून राज्यसभेचा खासदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन आता महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
Oct 19, 2013, 09:50 AM ISTपॉटिंग नावाचा साप सचिनवर पुन्हा उलटला
मुंबई इंडियन्स संघात सचिनच्या खांद्याला खांदा लावून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग पुन्हा एकदा उलटला आहे. मंकीगेट वादावरून पॉटिंगने सचिनच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.
Oct 17, 2013, 08:29 PM IST