sonia gandhi

कोण करतंय सोनियांची बदनामी?

अण्णा हजारेंच्या राज्यव्यापी दौऱ्यात सोनिया आणि राहूल गांधींची बदनामी करणारी पुस्तकं वाटण्यात येतात. पण, अण्णांना मात्र याचा थांगपत्ताही नसतो. ही घटना उघडकीस आलीय भंडाऱ्यामध्ये.

May 16, 2012, 06:37 PM IST

सचिन खासदार होणार?

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सचिनसमोर राज्यसभेच्या खासदारकीचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. स्पोर्टसच्या कोट्यातून नामनियुक्त सदस्य म्हणून सचिनने खासदार व्हावे, असा हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Apr 27, 2012, 08:40 AM IST

सचिनने घेतली सोनियांची भेट

मा्स्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं १० जनपथवर सोनिया गांधीचीं भेट घेतली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन पत्नी अंजलीसह सोनियांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे या भेटीमध्ये कशावर चर्चा झाली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Apr 26, 2012, 02:23 PM IST

शरद पवार भेटणार सोनिया गांधींना!

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या चर्चा करणार आहे. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निश्चितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Apr 25, 2012, 04:34 PM IST

मुख्यमंत्री सोनिया गांधींच्या भेटीला

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेलेत. या भेटीत मुख्यमंत्री मुंबई शहर अध्यक्ष निवडीबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. चव्हाण आणि सोनिया यांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Apr 21, 2012, 12:41 PM IST

मुख्यमंत्र्यांवर हायकमांड नाराज ?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या दिल्लीत अंतर्गत सुरक्षा परिषदेच्या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. मात्र ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटतील काय हे निश्चित झालेलं नाही.

Apr 14, 2012, 08:16 PM IST

काँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांमुळे - सोनिया

पाचपैकी चार राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या, आम्हाला धोका नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर (यूपीए) याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. आम्ही पराभव स्वीकारला आहे.

Mar 7, 2012, 10:36 PM IST

सोनिया गांधी भारतात परतल्या

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी भारतात परतल्या आहेत. त्या वैद्यकीय चाचणीसाठी २७ फेब्रुवारी रोजी परदेश दौऱ्यावर गेल्या होत्या. सोनिया गांधींवर सहा महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Mar 5, 2012, 03:40 PM IST

'सोनिया गांधींना अमेरिकेतून हाकला'

अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तात्काळ अमेरिकेतून हाकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी अमेरिकेतील एका शीख संघटनेने अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन या संघटनेने हिलरी यांना दिले आहे.

Mar 3, 2012, 04:37 PM IST

सोनिया गांधींची संपत्ती किती?

लोकसभा निवडणुकीच्या अर्जासोबत सोनियांनी आपल्याकडे १ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. ही आकडेबारी २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील आहे.

Feb 25, 2012, 05:01 PM IST

सोनियांना भीती, IT- रिटर्न जाहीर करण्याची

सार्वजनिक जीवनात पारदर्शकता यावी, यासाठी बडे नेते आणि प्रशासकीय अधिकारी आपली संपत्तीची माहिती जग जाहीर करतात. मात्र, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आपली संपत्ती जाहीर करण्याची भीती वाटत आहे. सोनियांच्या मते यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असून त्यांच्या सुरक्षेला धोका आहे.

Feb 24, 2012, 03:10 PM IST

प्रियंकाने घेतला सोनिया गांधींचा गालगुच्चा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियांका गांधी या मायलेकीचं प्रेम पाहून रायबरेलीतल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. या आधीही रायबरेलीतीलच प्रचारसभेत प्रियांकाने मंचावर आपल्या मुलांना धक्का दिला होता.

Feb 15, 2012, 11:49 AM IST

'...आणि सोनिया गांधी रडल्या'

उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रडल्या. सोनिया गांधी रडल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनीच दिली आहे.

Feb 10, 2012, 06:49 PM IST

रॉबर्ट वढेरांचे राजकारण प्रवेशाचे संकेत

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणात प्रवेश करण्याविषयी संकेत दिले आहेत. प्रियांका गांधींचे पती असलेल्या रॉबर्ट वढेरा यांनी सध्या राजकारणात राहुल गांधींची वेळ आहे पण जनतेने आग्रह केल्यास सक्रिय राजकारणात उतरु असं म्हटलं आहे.

Feb 6, 2012, 04:10 PM IST

भाजपचे सरकार लुटारू - सोनिया

उत्तराखंडमधील नैसर्गिक ठेवा लुटला जात आहे. तसेच येथील जमिनीची तिच स्थिती आहे. त्यामुळे सरकारमध्ये बदल हा एकमेव ठेवा जनत करण्याचा मार्ग आहे, असे मत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मंगळवार येथे व्यक्त केले.

Jan 17, 2012, 04:32 PM IST