सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने कॅम्पाकोला रहिवाशांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे रहिवाशांना 31 मे पर्यंत राहण्याचा दिलासा मिळाला आहे. याचिका फेटाळण्यात आल्याने मुंबई महापालिकेचा कारवाईचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
May 5, 2014, 01:18 PM ISTपद्मनाभस्वामी मंदिरातलं 80 कोटींचं सोनं चोरीला
तिरुवनंतपुरममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिन्यावर डल्ला मारला जात असल्याचा गौप्यस्फोट झाला आहे. या खजिन्यातून आतापर्यंत 80 कोटी रुपये किंमतीचे तब्बल 26 किलो सोनं चोरीला गेल्याचा अहवाल खजिन्यावर देखरेख ठेवणारे प्रतिनिधी अॅमिकस क्युरी, गोपाळ सुब्रमण्यम यांनी सुप्रीम कोर्टाला दिला आहे.
Apr 27, 2014, 11:35 AM IST‘लिव्ह इन’मधून होणारं मूल औरसच- सुप्रीम कोर्ट
अनेक वर्षांपासून `लिव्ह इन रिलेशन`मध्ये राहणाऱ्या जोडप्याला होणारं मूल हे औरसच असेल,` असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय. मद्रास हायकोर्टानं यासंदर्भात नोंदवलेल्या निरीक्षणास उद्य गुप्ता यांनी आव्हान दिलं होतं.
Apr 24, 2014, 10:47 PM ISTसुप्रीम कोर्टाची कोल्हापुरातील टोलला तात्पुरती स्थगिती
कोल्हापुरातील आयआरबी टोलवसुलीला अखेर तातपुरती स्थगित मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे.
Apr 21, 2014, 02:56 PM ISTस्पॉट फिक्सिंगच्या चौकशीसाठी बीसीसीआयची नवी समिती
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तपासासाठी नवी चौकशी समितीची नावं बीसीसीआयनं सुचवलीय. बीसीसीआयनं यासाठी तीन नावं सुचवलीत. यात रवी शास्त्री, माजी सीबीआय प्रमुख राघवन आणि जस्टिस पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे.
Apr 20, 2014, 07:15 PM ISTमहिलांना सलग ७३० दिवस विनाखंड सुट्टीचा हक्क!
कोणतीही केंद्रीय सरकारी नोकरदार महिला आपल्या सेवाकाळात आपल्या मुलांच्या संगोपणासाठी, मग ते परिक्षेसाठी असो किंवा आजारपणासाठी... सलग दोन वर्षांची सुट्टी घेऊ शकते, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
Apr 16, 2014, 12:10 PM ISTश्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाचा दणका
बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिला आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचा नि:पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी श्रीनीवासन यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे. त्यांनी अजून राजीनामा का दिला नाही, असा सवाल करत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयला फटकारलं आहे.
Mar 25, 2014, 12:20 PM IST`सहारा`चे सुब्रतो रॉय यांना पोलीस कोठडी
सहारा उद्योगसमूहाचे मालक सुब्रतो रॉय यांनी आज शुक्रवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यांनी ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
Feb 28, 2014, 11:09 AM ISTराजीव गांधी हत्या : मारेकऱ्यांच्या सुटकेला स्थगिती
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चार मारेकऱ्यांच्या सुटकेला आज सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती दिली. या स्थगितीमुळे जयललिता सरकारला मोठी चपराक बसली आहे.
Feb 27, 2014, 11:55 AM ISTराहुल गांधी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराज
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांची फाशी रद्द केल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केलीय. ज्या देशात पंतप्रधानांना न्याय मिळत नाही त्या देशात गरिबांना कुठून न्याय मिळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, जयललितांनी राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटू लागलेत. आज बंगळुरूमध्ये काँग्रेसनं जयललितांविरोधात आक्रमक होत आंदोलन केलं.
Feb 20, 2014, 05:17 PM ISTराजीव गांधीच्या ३ मारेकऱ्यांच्या सुटकेवर स्थगिती
राजीव गांधी यांच्या सात पैकी तीन मारेकऱ्यांना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश देईपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, तसेच हा निर्णय का घेण्यात आला याचे स्पष्टीकरणही सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारकडे मागितले आहे.
Feb 20, 2014, 01:29 PM ISTमनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मान्यता रद्द करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात आज जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसेला आगामी निवडणुका लढविण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
Feb 10, 2014, 01:19 PM ISTसमलैंगिक संबंध गुन्हाच- सुप्रीम कोर्ट
सुप्रीम कोर्टात समलैंगिक संबंध गुन्हा ठरविण्याच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची याचिका कोर्टानं फेटाळून लावलीय.
Jan 28, 2014, 03:14 PM ISTसुप्रीम कोर्ट `समलिंगी` जोडप्यांना दिलासा देणार?
समलिंगी संबंधाबाबत महत्त्वाचा कायदेशीर निर्णय आज होणार आहे. भारतामध्ये `गे रिलेशन` म्हणजेच समलिंगी संबंध हा गुन्हा असणार की नाही? याबाबत आणि पुढील कायदेशीर लढाईबाबत सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार आहे.
Jan 28, 2014, 11:36 AM ISTदया याचिकांवर निर्णयाला उशीर म्हणजे दोषींना मदत!
सुप्रीम कोर्टानं मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या दोषींच्या दया याचिका अनिश्चित काळापर्यंत अनिर्णित ठेवल्या जाऊ शकत नाही. जर असा उशीर होत असेल तर अशा दोषींची शिक्षा कमी होऊ शकते, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.
Jan 21, 2014, 12:57 PM IST