toothbrush expiry

ब्रश किती दिवसांनी बदलायला हवे?

आपण सर्वजण आपल्या दिवसाची सुरुवात दातांची स्वच्छता करुन करतो. दातांची स्वच्छता करण्यासाठी टुथब्रशचा वापर केला जातो. पण एक टुथब्रश किती दिवस वापरायला हवा? तुम्हाला माहिती आहे का? एक ब्रश 3 ते 4 महिने वापरायला हवे असे डेंटिस्ट म्हणतात. ब्रशचा वापर केल्याने कॅविटी आणि हिरड्यांचे आजार दूर राहतात. चांगल्या ओरल हेल्थसाठी ब्रश वेळोवेळी बदलत राहायला हवे असे हेल्थ एक्सपर्ट सांगतात. त्यामुळे रोज दात घासताना टुथब्रशवर लक्ष द्या. 

May 27, 2024, 08:58 PM IST

Toothbrush Expiry : तुम्हाला माहिती आहे का, किती दिवसांनी टूथब्रश बदलावा?, हे जाणून घेणे खूप महत्वाचे

Toothbrush Expiry Date : टूथब्रशलाही एक्सपायरी असते. किती दिवसांनी टूथब्रश बदलावा? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घ्या. कारण ते दातांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.

Jun 1, 2023, 08:42 AM IST