zee24taas

नागपुरात २४ तासांत ५ हत्या, शहरात २ मृतदेह आढळले

नागपुरात24 तासात दुसऱ्यांदा हत्याकांडाचा प्रकार पुढे आलाय. मंगळवारी पुढे आलेल्या तिहेरी हत्याकांडापाठोपाठ आज सकाळी दुहेरी हत्याकाडांचं प्रकरण पुढे येतंय. नागपूरच्या जयताळा परिसरात दोन मृतदेह आढळले आहेत. 

Nov 18, 2015, 12:18 PM IST

छेडछाडीला कंटाळून औरंगाबादेत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

औरंगाबादमध्ये सप्टेंबरमध्ये श्रुती कुलकर्णी या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर मंगळवारी परत तशीच घटना घडलीय. ऋतुजा गायके या दहावीतल्या मुलीनं छेडछाडीला वैतागून आपली जीवनयात्रा संपवलीय.

Nov 18, 2015, 11:28 AM IST

व्हिडिओ: 'स्पेशल २६', 'हॉलिडे', 'बेबी' नंतर आता अक्षयचा 'एअरलिफ्ट', टीझर रिलीज

सुपरस्टार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'एअरलिफ्ट'चं टीझर रिलीज झालंय. पहिलं रूप पाहूनच हा चित्रपटही खिलाडी किंगच्या बेबी आणि स्पेशल २६ सारखा आणखी एक जबरदस्त चित्रपट असल्याचं दिसतंय.

Nov 18, 2015, 10:38 AM IST

प्रवाशांच्या फुकटेपणावर रेल्वेचा चाप, तिकीटाचे किमान दर आता १० रु.

रेल्वेनं दुसऱ्या दर्जाच्या तिकीट दरात वाढ केलीय. या तिकीटाचे किमान दर पाच रुपयांवरून दहा रुपये करण्यात आलेत. प्रवासी भाड्यातली ही वाढ फक्त सर्वसाधारण तिकीटासाठीच झालीय. वाढलेले तिकीट दर लोकल ट्रेन्ससाठी लागू होणार नाहीत. 

Nov 18, 2015, 09:37 AM IST

आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!

पॅरिसमधल्या दहशतवादी हल्ल्यानं जागतिक पराराष्ट्र नीतीला नवी कलाटणी मिळतेय... दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात निर्माण झालेल्या भिंती या हल्ल्यानंतर मोडीत निघताना दिसतायत. 

Nov 18, 2015, 09:00 AM IST

विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांचं निधन

विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अशोक सिंघल यांचं दुपारी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून अशोक सिंघल आजारी होते. त्यांच्यावर गुडगावमधल्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. 

Nov 17, 2015, 03:39 PM IST

जगातील ४० देशांकडून इसिसला फंडिंग, 'जी२०'मधील काही देशांचाही समावेश- पुतीन

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी जगातील ४० देशांवर खळबळजनक आरोप केलाय. जगातील तब्बल ४० देशांकडून इसिस या दहशतवादी संघटनेला फंडिंग होत असल्याचं म्हटलंय. यात 'जी२०'मधीलही काही देशांचा समावेश असल्याचं पुतीन म्हणाले.

Nov 17, 2015, 01:31 PM IST

अवघ्या ६५० रुपयांमध्ये विकला जातोय एलजीचा स्मार्टफोन

अमेरिकन रिटेलर वॉलमार्टवर ट्रॅकफोन ब्रांडचा अँड्रॉइड एलजी स्मार्टफोन $९.८२ म्हणजे अवघ्या ६५० रुपयांमध्ये मिळतोय. सोबतच अमेरिकेत शिपिंग फ्री सुद्धा दिली जातेय. मात्र यात अँड्राइडचं जुनं वर्जन किट कॅट आहे. पण त्याचं स्पेसिफिकेशन आयफोन (iphone3G) पेक्षा चांगलं आहे.

Nov 17, 2015, 12:33 PM IST