नवी दिल्ली: भारतीय बाजारात अव्वल स्थान प्राप्त करणारी बजाज ऑटो कंपनीने नवीन बाईक लॉन्च केली आहे. काही दिवसापूर्वी कंपनीने पल्सर १८० एफ ही बाईक लॉन्च करण्याची घोषणा केली होती. बाईक चाहत्यांना ही बाईक नक्की आवडेल, अशीही शक्यता कंपनीने व्यक्त केली होती. या बाईकला बजाज ऑटोची २२० एफ यासारखी डिझाईन देण्यात आलेली आहे. दिल्ली येथील एक्स शोरुमध्ये या बाईकची किंमत ८७ हजार ४५० रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे बजाज कंपनीच्या वेबसाईटवर या बाईकला पल्सर निओन या नावाने रजिस्टर करण्यात आले आहे.
बाईकमध्ये १७८.६ सीसी इंजीन देण्यात आले आहे. हे इंजीन ८ हजार ५०० आरपीएमवर १७.०२ पीएसची पॉवर जनरेट करणार आहे. वबाईकमध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. तसेच बाईकमध्ये २३० एमएमचा डिस्क ब्रेकचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीकडून या बाईकमध्ये एबीएस सिस्टम लावण्यात आले नाही. मात्र, १२५ बजाजच्या १२५ सीसी वरील बाईकमध्ये एबीएस देण्यात आले आहे. १ एप्रिलपासून प्रत्येक बाईकमध्ये एबीएस यंत्रणेला सरकारने अनिवार्य केले आहे.
बजाजने पल्सर १८० एफ मध्ये १७ इंच का अलॉय व्हील दिला आहे. फ्रंटमध्ये ९०/९० सेक्शन टायर आणि रियर में १२०/८० सेक्शन टायर देण्यात आले आहे. बाइकची सीट २०३५ एमएम लांबीचे आहे. तसेच ऊंचीला ११५ एमएम आणि रुंदिला ७६५ एमएम आहे. बाईकचे वजन १५१ किलोग्राम आहे आणि ग्राउंड क्लीयरेंस १६५ एमएम आहे. बाइकमध्ये १५ लीटरची फ्यूल टॅंक देण्यात आले आहे.