मुंबई : गूगलतर्फे वेगवेगळे डूडल बनविले जातात. त्या दिवसाचं महत्व लक्षात घेऊन हे डूडल बनवलं जातं. आजही गूगलतर्फे असंच एक खास डूडल बनविण्यात आलं आहे.
आज गूगल डूडल हिप-हॉप म्युझिकचे ४४ वर्ष साजरं करत असल्याचं पहायला मिळत आहे. या गूगल डूडलमध्ये तुम्ही आपल्या आवडीच्या गाण्यांना मिक्सही करु शकता. म्हणजेच गूगलने तुम्हाला डीजे बनण्याची एक संधीच उपलब्ध करुन दिली आहे.
गूगलतर्फे बनविण्यात आलेल्या या डूडलमध्ये ग्राफिटी बनविण्यात आली आहे. ही ग्राफिटी आर्टिस्ट सी अॅडम्स यांनी बनविली आहे. गूगलच्या नावातील दोन 'O'च्या जागेवर टर्नटेबल बनविण्यात आलं आहे, जेथून हिप-हॉपची संपूर्ण कहानी सुरु झाली होती.
44 yrs & still going strong! Celebrate the #BirthofHipHop w/ interactive turntables & legendary tracks #GoogleDoodle→https://t.co/VsTUgsW13W pic.twitter.com/FQWs4x6uqV
— Google Doodles (@GoogleDoodles) August 11, 2017
यासोबतच गूगल डूडलची खास गोष्ट म्हणजे तुम्ही प्रसिद्ध हिप-हॉप आर्टिस्टच्या रेकॉर्ड्सला टर्नटेबलवर तुमचं म्यूझिक प्ले करु शकता.
हिप-हॉप म्युझिकचा जन्म आजच्याच दिवशी १९७३ साली झाला होता. १८ वर्षांच्या कूल हर्क याने याच दिवशी आपल्या घरात एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत त्याला काही वेगळं म्युझिक वाजवायचं होतं. त्यासाठी त्याने गाणं पूर्ण प्ले करण्याऐवजी गाण्याचं केवळ म्युझिक ब्रेक करत प्ले केलं.
यावेळी कूल हर्कने पाहिलं की, पार्टीत आलेले अनेकजण हे एन्जॉय करत आहेत. याच दरम्यान त्याचा मित्र कोक ला रॉकने माइकच्या माध्यमातून इन्ट्री केली. अशा प्रकारे ४४ वर्षांपूर्वी जगभरात हिप-हॉप म्युझिकचा जन्म झाला.