मुंबई : होन्डानं स्कूटरच्या मार्केटमधली पकड आणखी मजबूत करण्यासाठी भारतीय बाजारामध्ये आणखी एक स्कूटर लॉन्च केली आहे. २५ ऑक्टोबरपासून याच्या बुकिंगला सुरुवात झाली होती. पण स्कूटरची किंमत आणि फिचर्सबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. आता होन्डानं Graziaची किंमत आणि फिचर्सबाबत माहिती दिली आहे.
होन्डाच्या Grazia ही पहिली स्कूटर आहे, ज्यात LED हेडलाईट देण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये 124.9CCचं 4 स्ट्रोक इंजिन आहे. स्कूटरमध्ये सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्ट असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत. स्कूटरचा व्हील बेस 1,260mm एवढा आहे. तर स्कूटरची किंमत 57,897 रुपये एवढी असणार आहे. लॉन्चिंग आधी या स्कूटरची किंमत 65 हजारांच्या घरात असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
Graziaच्या या स्कूटरमध्ये 12 इंचाचं ब्लॅक अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आणि टेलीस्कॉपिक फ्रंट सस्पेंशनसारखे फिचर्स आहेत. याचबरोबर डिजीटल डिस्प्ले, डाव्या बाजूला स्टोरेज स्पेसही देण्यात आला आहे. होन्डा Graziaची स्पर्धा अॅक्टीव्हा 125, सुजुकी एक्सेस 125, वेस्पा वीएक्स 125 आणि महिंद्रा गुस्टो 125 बरोबर होणार आहे. होन्डा Grazia सहा रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.