मुंबई : आजकाल आपण सगळंच काम करण्यासाठी मोबाईलचा वापर करतो. मोबाईल हा आपल्या सर्वांची फार मोठी गरज बनली आहे. घराबाहेर पडल्यानंतर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल, तर आपण फोनमधील गुगल मॅप, M-indicator वापरतो, तसेच फोन करण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी अशा बऱ्याच कामासाठी फोन आपल्याला लागतोच. परंतु ही सगळी काम होतात ती, फक्त इंटरनेटवर. परंतु जर त्यात तुमचा इंटरनेट संपलं तर? बर्याच लोकांना हे माहित नसते की, ते त्यांच्या आसपासचे वाय-फाय त्यांच्या डिव्हाइसशी विनामूल्य कनेक्ट करू शकतात.
सोशल मीडिया दिग्गज फेसबुकनेही युजर्सना ही सुविधा दिली आहे. फेसबुकच्या मोफत वाय-फाय सेवेसह तुम्ही मोफत इंटरनेट वापरू शकता. याचा अर्थ यासाठी तुम्हाला कोणत्याही समर्पित हॉटस्पॉट सर्च अॅपची गरज भासणार नाही
हे वाय-फाय विश्वसनीय आहेत आणि बहुतेक प्रकरणांमध्ये ते विनामूल्य देखील मिळते. जर तुम्ही फेसबुकच्या वाय-फाय फाइंडरबद्दल कधीच ऐकले नसेल, तर आम्ही त्याबद्दल आज तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
फेसबुकचे हे फिचर अॅपमध्ये लपलेले आहे. हे फीचर फेसबुक अॅपवर अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे. या मार्गदर्शकामध्ये आम्ही तुम्हाला फेसबुकच्या या सिक्रेट टूलबद्दल सांगत आहोत. यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या iPhone किंवा Android अॅपवर फेसबुक अॅप उघडावे लागेल.
यानंतर, तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन-लाइन मेनू बटणावर क्लिक करावे लागेल. मेनू स्क्रीनमध्ये, तुम्हाला सेटिंग्ज आणि गोपनीयता या पर्यायावर जावे लागेल. येथे तुम्हाला Find Wi-Fi चा पर्याय निवडावा लागेल.
यानंतर, फेसबुक तुमच्या आसपासच्या उपलब्ध सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटबद्दल सांगेल. त्यात नकाशा आणि ठिकाण या दोन्हींची माहिती मिळते. जर तुम्हाला जवळपासचे हॉटस्पॉट दिसत नसतील तर तुम्हाला पुन्हा सर्च वर क्लिक करावे लागेल.
यानंतर, तुम्ही See More बटणावर क्लिक करून वाय-फाय हॉटस्पॉटबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला वाय-फायचे नाव, त्याचा वेग अशी माहिती दिली जाते. पर्यायावर क्लिक करून तुम्ही त्याच्याशी जोडले जाऊ शकता.
परंतु हे लक्षात घ्या की, या पर्यायात तुम्हाला विनामूल्य आणि सशुल्क वाय-फाय दोन्ही असू शकतात. याशिवाय तुम्ही कोणत्याही टेलिकॉम कंपनीच्या अधिकृत अॅपवरून रिचार्ज केल्यास तुम्हाला फ्री डेटा दिला जातो.
उदाहरणार्थ Airtel बद्दल बोलायचे झाले तर, Rs 359 वरील सर्व रिचार्जवर, कंपनी 1GB डेटासह 2 कूपन देते. तर 479 रुपयांच्या रिचार्जवर कंपनी 1GB डेटासह 4 कूपन देते. यासाठी अॅपवरून रिचार्ज करावे लागेल. अशीच ऑफर Jio आणि Vi ने देखील दिली आहे जी तुम्ही रिचार्ज करण्यापूर्वी तपासू शकता.