iPhone प्रेमींसाठी आनंदाची बातमी; नव्या फोनमध्ये मिळणार भन्नाट फीचर

कंपनीने iPhone 14 च्या फीचर्सबद्दल अजून कोणतीही माहिती जारी केलेली नाही. मात्र तरीही परंतु लीक झालेल्या माहितीनुसार, Apple च्या या फोनच्या फीचर्सची चर्चा होतेय. 

Updated: Jan 28, 2022, 11:05 AM IST
iPhone प्रेमींसाठी आनंदाची बातमी; नव्या फोनमध्ये मिळणार भन्नाट फीचर title=

मुंबई : Apple दरवर्षी त्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचं नवीन मॉडेल बाजारात आणतं. 2021 मध्ये आयफोन 13 चार विविध मॉडेल्समध्ये लॉन्च करण्यात आला. तर आता यावर्षीही आयफोन प्रेमींसाठी एक नवा आयफोन येणार आहे. 2022 मध्ये आयफोन 14 लॉन्च केला जाणार आहे. 

कंपनीने iPhone 14 च्या फीचर्सबद्दल अजून कोणतीही माहिती जारी केलेली नाही. मात्र तरीही परंतु लीक झालेल्या माहितीनुसार, Apple च्या या फोनच्या फीचर्सची चर्चा होतेय. iPhone 14 चं नवीन मॉडेल लॉन्च केले जाईल ज्यामध्ये Apple च्या कोणत्याही फोनमध्ये हे फीचर देण्यात आलेलं नाही.

आयफोन 14 शी संबंधित मिळालेल्या माहितीमध्ये असं समोर आलंय की, आयफोन 14 मध्ये ई-सिम फीचर देण्यात येणार आहे. Apple फिजीकल सिम कार्ड ट्रे काढून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार्‍या iPhone 14 मध्ये हे फीचर असण्याची शक्यता आहे. हे फीचर  एक ऑप्शनल फीचर म्हणून आणलं जाईल, ज्यामुळे iPhone 14 चं ई-सिम मॉडेल देखील काढलं जाऊ शकतं.

iPhoneमध्ये ई-सिम सेवा

अॅपल पूर्णपणे ई-सिम फोनकडे वळण्याची तयारी करतंय असं नाही. पण GlobalData विश्लेषक Emma Mohr-McClune यांच्या म्हणण्याप्रमाणे, कंपनी सध्या पूर्णपणे ई-सिम फक्त iPhones वर शिफ्ट करत नाहीये. पण ते iPhone 14 मध्ये ऑप्शनल मॉडल म्हणून नक्कीच सुरूवात करतील. ई-सिम असलेला हा आयफोन अॅपलच्या स्टोअरमधून खरेदी करता येतील.