मुंबई : MI आणि सॅमसंग सारख्या तगड्या फोनने सध्या मार्केट खाल्लं आहे. या दोन्ही कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एक कंपनी आपला फोन लवकरच लाँच करणार आहे. या कंपनीच्या फोनचे फीचर्स आणि लाँचिंग डेट लवकरच समोर आली आहे.
iQOO स्मार्टफोन ब्रॅण्डने Neo 6 नुकताच चीनमध्ये लाँच केला आहे. लवकरच तो भारतातही लाँच होईल असं सांगण्यात आलं आहे. या फोनच्या लाँचिंगची तारीख आणि फीचर समोर आले आहेत.
iQOO Neo 6 फोन मेच्या शेवटच्या आठवड्यात भारतात लाँच होईल असा अंदाज आहे. त्यामुळे त्या दृष्टीने याचे बुकिंग्स देखील पुढच्या आठवड्यात सुरू होऊ शकतात. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात तो उपलब्ध होऊ शकतो अशी शक्यता आहे.
या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. 8GB RAM आणि 128GB स्टोअरेज देण्यात आलं आहे. तर यामध्ये दुसरा व्हेरिएंट 12GB RAM आणि 256GB स्टोअरेज देण्यात आला आहे.
या फोनला 4,700mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबत 80 W चा सुपरफास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे. 30 ते 35 मिनिटांत तुमचा फोन फुल्ल चार्ज होणार असा दावा कंपनीने केला आहे.
कॅमेऱ्याचा विचार केला तर फुल एचडी+ रेसोल्यूशनसोबत 6 6.7-इंच अॅम्युलेटेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसणार आहे. 64MP मेन सेन्सर आणि 12 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2 MP मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. 16 MP सेल्फी कॅमेरा आहे ज्यातून सुंदर सेल्फी काढता येतील.
128GB स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत साधारण 30 हजारच्या आसपास असू शकते तर 256 GB स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत 35 हजार रुपये असू शकते असा अंदाज आहे.