Jio vs Airtel : रिलायन्स जिओ आणि एअरटेल या देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्या त्यांच्या प्रीपेड युजर्सना आकर्षित करण्यासाठी आणि नवीन युजर आणण्यासाठी सतत नवीन योजना लॉन्च करत असतात. एअरटेलकडे अनेक प्रीपेड योजना आहेत ज्यात दररोज डेटा, अमर्यादित कॉल आणि विनामूल्य OTT अॅप्सचा समावेश आहे. तर रिलायन्स जिओकडे देखील अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत.
खास गोष्ट म्हणजे Jio आणि Airtel चा 499 रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. Jio-Airtel ने 499 रुपयांमध्ये काय ऑफर दिली आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 499 रुपयांमध्ये कोण अधिक लाभ देत आहे ते जाणून घ्या.
एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 56 जीबी डेटा वापरू शकतात.
याशिवाय एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स मोफत मिळतात. म्हणजेच, देशभरातील एअरटेल ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉल करू शकतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस फ्री आहेत.
एअरटेलचा हा प्रीपेड प्लान डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन फ्री ऑफर करतो. जी 1 वर्षासाठी विनामूल्य आहे. याशिवाय प्लॅनमध्ये Appolo24|7 Circle, Fastag वर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री HelloTunes आणि Wynk Music Free सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत.
रिलायन्स जिओच्या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना एकूण 56 GB डेटा ऑफर करण्यात आला आहे.
या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स देखील मिळतात. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर देशभरात अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल करू शकतात. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत.
रिलायन्स जिओचा 499 रुपयांचा रिचार्ज पॅक डिस्ने+ हॉटस्टार, जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओक्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो. या प्लॅनमध्ये उपलब्ध जिओ सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत आहे.