अशी आहे मारुती सुजुकीची नेक्स्ट जनरेशन WAGON-R, फोटोज झाले Leaked

नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्सपोमध्ये मारुती सुजुकीने नवी स्विफ्ट लॉन्च केली होती. यानंतर आता आपल्या वॅगनआरचं नव व्हेरिएंट लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 17, 2018, 04:27 PM IST
अशी आहे मारुती सुजुकीची नेक्स्ट जनरेशन WAGON-R, फोटोज झाले Leaked title=

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्सपोमध्ये मारुती सुजुकीने नवी स्विफ्ट लॉन्च केली होती. यानंतर आता आपल्या वॅगनआरचं नव व्हेरिएंट लॉन्च करण्याची कंपनीची योजना आहे.

वॅगनआरला नेक्स्ट जनरेशन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलं आहे. वॅगनआरच्या जुन्या मॉडेलने भारतीय बाजरपेठेत एकच धुमाकूळ घातला होता.

टेस्टिंग दरम्यान पहायला मिळाली कार 

मारुती सुजुकीची नवी वॅगनआर कार पहिल्यांदा टेस्टिंग दरम्यान पहायला मिळाली. भारतीय बाजारपेठेत या वर्षाच्या अखेरपर्यंत ही कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. कॅमेऱ्यात कैद झालेल्या या नव्या कारला कव्हरने झाकण्यात आळं आहे. मात्र, असं असलं तरी कारची डिझाईन समजू शकते.

Next generation, Maruti Suzuki, New WagonR, Testing In India, Maruti New launch

हियरटेक प्लॅटफॉर्मवर कार तयार

नवी वॅगनआर कार सुजुकीने नव्या हियरटेक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याच प्लॅटफॉर्मवर नवी स्विफ्ट, डिझायर, इग्निस आणि बलेनो तयार करण्यात आली आहे. नव्या कारच्या पुढील भाग जपानमधील वॅगनआर सारखाच आहे.

हे असणार कारचे फिचर्स

नव्या वॅगनआर कारला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारच्या दोन्ही बाजुला वर्टिकल हेडलॅम्प्स लावण्यात आले आहेत. दरवाज्यांचे डिझाईन्स बदलण्यात आले आहेत. टेललॅम्प्सला बूट लिडच्या खाली जागा देण्यात आली आहे. तसेच कारमध्ये अॅन्टी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि ड्यूअल एअरबॅग स्टँडर्ड मिळणार आहे.

Next generation, Maruti Suzuki, New WagonR, Testing In India, Maruti New launch

असं असणार गाडीचं इंजिन

नव्या वॅगनआरमध्ये १.० लीटर पेट्रोल इंजिन दिलं जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन ६८ पीएस पावर आणि ९० Nmचं टॉर्क देतं. इंजिनसोबतच ५ स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आलं आहे. तसेच ५ स्पीड एएमटी गियरबॉक्सचाही पर्याय देण्यात आला आहे.

किती असणार मायलेज?

नव्या वॅगनआर गाडीचा मायलेज २२ किमी प्रति लीटर असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या वॅगनआरचा मायलेज २०.५१ किमी प्रति लिटर आहे.

गाडीची किंमत?

सध्याच्या वॅगनआरची किंमत ४.१८ लाख रुपयांपासून ५.३९ लाख रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे. मात्र, हियरटेक प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली नवी वॅगनआर कारती किंमत वाढण्याची शक्यता आहे.