नवी दिल्ली : जपानची कार निर्माता कंपनी सुजुकीने आपली स्विफ्ट कार नव्या अपडेट्ससह लॉन्च केली आहे. सुजुकीने स्विफ्ट स्पोर्ट्स ही नवी कार टोकियो मोटर शो २०१७ मध्ये ही कार लॉन्च केली.
जापानमध्ये स्विफ्ट स्पोर्ट्स या नव्या कारची किंमत १८,३६,००० जापानी येन (जवळपास १०.६२ लाख रुपये) पासून २०,५०,९२० जापानी येन (जवळपास ११.९ लाख रुपये) अशी आहे.
सुजुकी आपली स्विफ्ट स्पोर्ट्स ही कार भारतातही लॉन्च करण्याचा विचार करत आहे. तर, सर्वसाधारण सुजुकी स्विफ्ट हैचबॅकला भारतात फेब्रुवारी २०१८मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.
सुजुकीने स्विफ्ट स्पोर्ट २०१७ या कारमध्ये १.४ लीटर, ४ सिलिंडर बुस्टरजेट इंजिन दिलं आहे. हे इंजिन १४० PS च्या पॉवर आणि २३० NMचं टॉर्क जनरेट करेल. इंजिनला ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटीक गियरबॉक्सशी जोडलं गेलं आहे.
मॅन्युअल गिअर असलेल्या कारचं वजन ९७० किलो आणि ऑटोमॅटीक ट्रान्समिशन असलेल्या कारचं वजन ९९० किलो आहे. त्यामुळे या कारचं वजन सध्याच्या मॉडलपेक्षा ९० किलोंपेक्षा कमी आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेली स्विफ्ट स्पोर्ट १६.४ kmpl आणि ऑटोमॅटीक ट्रान्समिशन असलेली स्विफ्ट स्पोर्ट १६.२ kmpl चं मायलेज देते.
कारची बॉडील पूर्वीपेक्षा शाईन करेल आणि याच्या बेसचा विचार केला तर १७ इंचाचे व्हिल देण्यात आले आहे. कारच्या सीट्सला नवा लूक देण्यात आला आहे. बकेट सीट या कारला आणखीन आकर्षक बनवते. लेदरने कव्हर केलेलं स्टेअरिंग व्हिल जबरदस्त लूक देतं.