Tata Tiago EV चं कोणतं व्हेरियंट तुमच्या बजेटमध्ये? एका क्लिकवर संपूर्ण प्राइस लिस्ट

टाटा मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त टाटा टियागो इलेक्ट्रिक (TataTiagoEV) कार लाँच केली आहे. या गाडीची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते.

Updated: Sep 28, 2022, 06:09 PM IST
Tata Tiago EV चं कोणतं व्हेरियंट तुमच्या बजेटमध्ये? एका क्लिकवर संपूर्ण प्राइस लिस्ट title=

Tata Tiago EV Price and Features: टाटा मोटर्सने देशातील सर्वात स्वस्त टाटा टियागो इलेक्ट्रिक (TataTiagoEV) कार लाँच केली आहे. या गाडीची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते. या इलेक्ट्रिक कारचे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि त्याची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. 21 हजार रुपयांत बुक करता येईल. एकूण 5 कलर ऑप्शनमध्ये गाडी उपलब्ध असेल. दोन बॅटरी पॅक आणि तीन चार्जिंग पर्यायांसह वेगवेगळ्या व्हेरियंटसह आहे. स्वस्त व्हेरियंट तुम्हाला 250 किमी, टॉप व्हेरियंट 315 किमी पर्यंत रेंज देते. ही गाडी कंपनीच्या पेट्रोलवर चालणाऱ्या Tata Tiago हॅचबॅकवर आधारित आहे. 

Tata Tiago EV ची किंमत रु. 8.49 लाख ते रु. 11.79 लाख (एक्स शोरूम) आहे. यापूर्वी, कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार होती Tata Tigor EV ची किंमत रु. 12.49 लाख ते रु. 13.64 लाख (एक्स-शोरूम) होती.Tata Tiago EV च्या पहिल्या प्रकारात 24kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 315 किमीची रेंज देऊ शकते. तर दुसरी बॅटरी 19.2 kWh ची आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ते 250 किमी पर्यंत धावू शकते असा कंपनीचा दावा आहे. जिथे 19.2 kWh बॅटरीसह 3.3 kW AC चार्जिंग पर्याय देण्यात आला आहे. तर 24kWh बॅटरीसह 3.3 kW AC आणि 7.2 kW AC चार्जिंग पर्याय उपलब्ध होणार आहेत.

कंपनीचा दावा आहे की, बॅटरी 57 मिनिटांत 80 टक्के चार्ज होऊ शकते. यात Tata Tigor EV प्रमाणेच इलेक्ट्रिक मोटर आणि फ्रंट-व्हील ड्राइव्ह सेटअप आहे. ही मोटर 74.7PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. Tiago EV मध्ये क्रूझ कंट्रोल, मल्टिपल री-जेन मोड सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ही गाडी केवळ 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडू शकते.