Maharashtra Weather News : आयएमडीनं जारी केलेल्या माहितीनुसार पूर्वोत्तर आसामवर चक्रिवादळसदृश्य वारे सक्रिय असून, बांगलादेशच्या पूर्वेपासून आरामच्या उत्तरेपर्यं आणि ओडिशाच्या काही भागापर्यंतही चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं देशाच्या पूर्वोत्तर राज्यांवर याचा थेट परिणाम होताना दिसणार आहे.
इथं महाराष्ट्रावरही चक्राकार वारे सक्रिय असून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं विदर्भापर्यंत त्याचे परिणाम दिसत असून सध्या इथं अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सध्याच्या घडीला राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होताना दिसत असून, मध्य महाराष्ट्रापासून विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/j9ln8mcJ7b— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 9, 2024
हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यादरम्यान ताशी 40-50 kmph वेगानं वारे वाहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागात हवामान दमट राहील, तर उष्मा अधिक भासणार आहे. तर, मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ आणि दुपारपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील असा अंदाज आहे.