Nagpur Fire : नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सेमिनरी हिल्स परिसरातील एका घराला आग लागली आणि या आगीत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री 10 वाजताच्या सुमारास सेमिनरी हिल्स परिसरातील हजारीपहाडमधील गौरखेडे कॉम्प्लेक्समध्ये ही दुदैवी घटना घडली. यात दोन भावांचा मृत्यू झाल आहे. देवांश उईके हा 7 वर्षांचा तर प्रभास उईके 2 वर्षांचा चिमुरडा या आगीत बळी ठरला. (Nagpur News two children dies in firecracker incident)
आई दिपाली कामानिमित्त बाहेर गेली असता थंडीपासून बचाव करण्यासाठी मुलांनी घरात शेकोटी पेटवली. यानंतर या शेकोटीच्या आगीने घराचा ताब्या घेतला. काही वेळातच आग संपूर्ण घरात पसरली. घरात या दोन भांवडासोबत त्यांची 10 वर्षांची बहिणीदेखील होती. आग लागल्यावर चिमुरड्यांनी आरडाओरडा केला पण त्यांचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही. त्यांच्या बहिणीने कसाबसा आपला जीव बचावला मात्र देवांश आणि प्रभास या आगीच्या विळख्यात सापडले.
काही वेळातच या आगीने त्या दोन सख्या भावांना आगीने आपल्या कवेत सामावून घेतले. ज्यात त्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान मुख्य रस्त्यावरून एका व्यक्तीला आगीचे लोट दिसले. त्याने घटनास्थळी धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अग्निशमन विभाग आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. रात्री उशीरापर्यंत आग विझविण्याचं काम सुरू होतं. दोन्ही भावांना बाहेर काढण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
विदर्भात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत थंडीपासून बचाव म्हणून अनेक जण शेकोटी लावतात. मात्र या शेकोटी अनेक वेळा भीषण आगीचं कारण ठरतात. घरात मोठी व्यक्ती नसताना या मुलींनी शेकोटी पेटवली आणि मोठी दुर्घटना घडली. या घटनेत लहान बहिणीचा जीव वाचला आहे. मात्र त्या दोन भावंडांचा बळी गेला आहे. आई कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे ही मुलं घरात एकटी होती. त्यात झोपपट्टी परिसरातील हे घर इतर वस्तीपासून काही अंतर दूर असल्याने घटनेच्या वेळी त्या मुलांचा आवाज इतर घरांमध्ये पोहोचू शकला नाही. दरम्यान लहान मुलं सोबत असताना शेकोटी पेटवतांना विशेष काळजी घ्या.