पुणे: जुन्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ रविवारी भीषण अपघात झाला. यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. लोणावळा परिसरातील दुपारी तीनच्या सुमारास कार्ला फाट्याजवळ हा अपघात झाला. यावेळी दोन कारची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातमधील मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
मुंबईच्या दिशेने जाणारी स्वीफ्ट एम. एच. १४ (पिंपरी-चिंचवड) तर पुण्याच्या दिशेने येणारी सॅन्ट्रो एम. एच. १२ (पुणे) पासिंग असलेल्या या दोन कारची समोरासमोर धडक झाली. स्वीफ्ट कार सॅन्ट्रो कारवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. स्वीफ्टमधील ५ प्रवासी आणि सॅन्ट्रोमधील दोघे असे एकूण ७ जण जागीच ठार झाले आहेत.