Earthquake In Turkey: तुर्की भुकंपाने (Turkey Earthquake) हादरलं असून आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. भूकंपाचा हादरा इतका जबरदस्त होता की, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असल्याने मृतांचा (Turkey Earthquake Death) आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, Osmaniye प्रांतातील 5 आणि Sanliurfa येथील 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे 17.9 किलोमीटर (11 मैल) खोलीवर हा भूकंप झाला. दरम्यान USGS ने 15 मिनिटांनंतर पहिल्या ठिकाणी पुन्हा 6.7-रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली.
Horrific news of tonight’s earthquake in #Turkey & northern #Syria — the damage looks extensive.
The epicenter region is home to millions of refugees and IDPs, many of whom live in tents & makeshift structures. This is the absolute nightmare scenario for them. And it’s winter. pic.twitter.com/oACzWYtWb2
— Charles Lister (@Charles_Lister) February 6, 2023
गझियानटेपचा सीरियाला लागून असणारा दक्षिणेकडील प्रदेश आहे. हा तुर्कस्तानच्या प्रमुख औद्योगिक आणि उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. AFP च्या वृत्तानुसार,, लेबनॉन (Lebanon), सीरिया (Syria) आणि सायप्रस (Cyprus)मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
तुर्कीमधील अधिकाऱ्यांनी अद्याप जखमी किंवा मृत्यूंची अधिकृत नोंद केलेली नाही. पण सोशल मीडियावर भूकंपानंतरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये प्रचंड नुकसान झाल्याचं दिसत आहे. अनेक इमारती कोसळल्या असल्यानो लोक त्याखाली दबले असल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांचा आकडा फार वाढू शकतो. या सर्व ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
तुर्की जगातील सर्वात सक्रिय भूकंप क्षेत्रांपैकी एक आहे. 1999 मध्ये तुर्कीत सर्वात मोठा भूकंप आला होता. Duzce प्रांतात हा भूकंप आला होता. या भूकंपात तब्बल 17 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये इस्तानबूलमधील 1000 लोकांचा समावेश होता. सुरक्षिततेची खबरदारी न घेता मोठ्या इमारतींना परवानगी दिलेल्या इस्तांबूलचा मोठ्या भूकंपामुळे विनाश होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
जानेवारी 2020 मध्ये Elazig येथे 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये, Aegean समुद्रात 7.0 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामध्ये 114 लोक ठार आणि 1,000 हून अधिक जखमी झाले होते.