बस दरीत कोसळून २२ लोकांचा मृत्यू...

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अटक जिल्ह्यात बस दरीत कोसळली. बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत २२ लोकांचा मृत्यू झाला तर ५१ लोक जखमी झाले. पंजाब राजमार्ग पेट्रोलिंग पोलीस अधिकारी जीशान अफजल यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अटकच्या पिंडी गेप क्षेत्रात सुमारे १० वाजता झाली. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 9, 2017, 12:31 PM IST
बस दरीत कोसळून २२ लोकांचा मृत्यू...  title=

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अटक जिल्ह्यात बस दरीत कोसळली. बुधवारी झालेल्या या दुर्घटनेत २२ लोकांचा मृत्यू झाला तर ५१ लोक जखमी झाले. पंजाब राजमार्ग पेट्रोलिंग पोलीस अधिकारी जीशान अफजल यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना अटकच्या पिंडी गेप क्षेत्रात सुमारे १० वाजता झाली. 

दुर्घटना झाल्यानंतर तेथील स्थानिक लोक, पोलीस आणि बचाव दल तातडीने घटनास्थळी पोहचले आणि लगेचच मदतकार्य सुरु करण्यात आले. त्यात १८ मृतदेह हाती लागले. तर रुग्णालयात पोहचण्याआधीच चार जणांनी आपले प्राण सोडले. 

रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृतांची संख्या वाढू शकते. कारण ७ जखमींची प्रकृती गंभीर आहे. अटकहून लाहोरला जाणाऱ्या या बसमध्ये ८२ प्रवासी प्रवास करत होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालकाने गाडी वळवल्यानंतर त्याचे बसवर नियंत्रण राहिले नाही. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री  शाहबाज शरीफ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला.