इस्लामाबाद : Petrol Bomb Attack in Pakistan : दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानात रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या (Pakistan) लाहोरमध्ये (Lahore) बंदी घातलेल्या तेहरीक-ए-लब्बाईक (Tehreek E Labbaik) पाकिस्तानचे विरोधक आणि समर्थकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. यामध्ये तीन पोलीस ठार झाले तर अनेक जखमी झाले.
तेहरिक-ए-लब्बाईक (Tehreek E Labbaik) पाकिस्तानचा प्रमुख साद हुसेन रिझवी याच्या सुटकेच्या मागणीसाठी लाहोरमध्ये (Lahore) निदर्शन करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या या निदर्शनात हजारो लोक सहभागी झाले होते. तहरीक-ए-लब्बाईक पाकिस्तानने लाहोर ते इस्लामाबादपर्यंत लाँग मार्च सुरू काढला.
लाहोरचे डीआयजी (ऑपरेशन) प्रवक्ते मजहर हुसेन यांनी सांगितले की, तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. अन्य अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, आंदोलकांनी पोलिसांच्या पथकावर पेट्रोल बॉम्बही फेकले. तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानचे समर्थक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी संतप्त होऊन पोलीस पथकावर हल्ला केला.
मजहर हुसैन यांनी सांगितले की, रॅलीत सहभागी लोकांना इस्लामाबादला जायचे होते. जेणेकरून ते साद हुसैन रिझवीच्या सुटकेसाठी पाकिस्तान सरकारवर दबाव आणू शकतील. पैंगबर मोहम्मद यांची व्यंगचित्रे काढल्याबद्दल फ्रान्सविरोधात झालेल्या निदर्शनेदरम्यान साद हुसेन रिझवी यांना गेल्यावर्षी अटक करण्यात आली होती.