Travel Documents : जगातील कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या देशात जायचं असेल तर पासपोर्ट (Passport) आवश्यक आहे. पासपोर्टशिवाय कोणतीही व्यक्ती दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही. राष्ट्रपती ते पंतप्रधान जेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जातात तेव्हा त्यांनाही डिप्लोमॅटिक पासपोर्ट (Diplomatic Passport) ठेवावा लागतो. पासपोर्ट त्या व्यक्तीची ओळख आणि राष्ट्रीयत्वचं दस्ताऐवज आहे. पासपोर्टमध्ये संबंधित व्यक्तीचं नाव, छायाचित्र, जन्म ठिकाण आणि जन्मतारीख, स्वाक्षरी आणि पासपोर्टची कालबाह्यता तारीख असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगात असे 3 खास लोक आहेत ज्यांना दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्टची गरज नाही. या 3 व्यक्ती नक्की कोण आहेत, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. (britain king and Japan emperor and empress of this 3 people have freedom to go anywhere in the world without a passport)
राजा चार्ल्स तिसरा हे या महिन्यातच ब्रिटनचे राजा झालेत. त्यांची आई आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांनी या पदाची सूत्रं हाती घेतलीत. ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांना पूर्ण आदराने कुठेही प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्यांच्या प्रोटोकॉलची विशेष काळजी घेतली जावी, असं ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व देशांना सूचित केलं. किंग चार्ल्सच्या आधी, त्याची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांना पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याचा अधिकार होता.
राजा किंवा राणीलाच पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याचा अधिकार आहे. राजा चार्ल्स तृतीयच्या पत्नीला परदेशात जायचे असेल तर तिला डिप्लोमॅटिक पासपोर्टची आवश्यकता असेल. त्याचप्रमाणे राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या काळात त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांनाही परदेशात जाण्यासाठी डिप्लोमॅटिक पासपोर्ट बाळगावा लागला होता.
सध्या जपानचे सम्राट नारुहितो आहेत आणि त्यांची पत्नी मासाको ओवाडा ही जपानची सम्राज्ञी आहे. सम्राट आणि सम्राज्ञींना पासपोर्टशिवाय परदेशात जाण्याची व्यवस्था 1971 मध्ये सुरू झाली. जपान जगातील सर्व देशांना अधिकृत पत्र पाठवते की हे पत्र सम्राट आणि सम्राज्ञींना त्यांच्या देशात जाण्यासाठी त्यांचा पासपोर्ट समजावे.