मुंबई : Omicron हा कोरोनाचा नवीन प्रकार भारतात दाखल झालाय. गुरुवारी, आरोग्य मंत्रालयाने सांगितले की कर्नाटकात ओमिक्रॉनच्या दोन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. जगभरात ओमिक्रॉनबद्दल वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी असा इशारा दिला आहे की, लोकांना कोरोनाचा किरकोळ संसर्ग होईल असे समजू नये.
'द गार्डियन'मधील वृत्तानुसार, लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमधील रोग उद्रेक विश्लेषणाचे प्रमुख नील फर्ग्युसन यांनी ब्रिटिश खासदारांना सांगितले आहे की, ओमिक्रॉनला धोका किती गंभीर आहे, हे डिसेंबरपर्यंत स्पष्ट होणार नाही.
ओमिक्रॉन प्रकाराच्या धोक्याबद्दल बोलताना फर्ग्युसन म्हणाले, 'विषाणू श्वसन प्रणालीमध्ये जातो आणि वातावरणात वेगाने पसरतो ही बाब मोठी चिंता वाढवतो आहे.'
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने ओमिक्रॉन प्रकाराबद्दल म्हटले आहे की, तो संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. प्राथमिक डेटामध्ये असे दिसून आले आहे की ओमिक्रॉनमध्ये एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्याची उच्च क्षमता आहे. त्याचा व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही वाईट परिणाम होतो.
WHO ने नव्या ओमिक्रॉन व्हायरसबाबत संपूर्ण जगाला सावधगिरीचा इशारा दिला आहे. कारण याआधीचा डेल्टा वेरिएंट अजूनही संपूर्ण जगासाठी धोका ठरत आहे.
डेल्टा प्रकार टाळण्यासाठी सर्व देशांनी विद्यमान सर्व उपायांचे पालन केले पाहिजे. जर आपण असे केले तर आपण Omicron चा प्रसार रोखू शकतो आणि लोकांचे प्राण वाचवू शकतो.