नवी दिल्ली : चीन सीमेवर तणाव असताना देखील शांत बसत नाहीये. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यानंतर आता उत्तर लडाखमधील डेपसांगमध्ये सैन्यांची संख्या वाढवत आहे. त्यानंतर दौलत बेग ओल्डि (डीबीओ) मध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिकांची संख्या ही वाढविण्यात आली आहे. २०१३ पासून या भागात दोन्ही सैन्यामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.
चीनचे आव्हान पेलण्यासाठी भारतानेही तयारी केली आहे. लडाखमध्ये भारताने सर्वोत्कृष्ट टी -९० टँक तैनात केले आहेत. भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये सुरू झालेला सीमावाद गेल्या दोन महिन्यांपासून सुरु आहे. वृत्तानुसार चीनने आपल्या सीमेवर टँक सशस्त्र गाड्या आणि सैनिकांची संख्या वाढवली आहे. प्रत्युत्तरात भारताने आपले सर्वात घातक शस्त्र लडाखमध्ये तैनात केले आहेत.
लडाखच्या मोकळ्या मैदानातून टँकने मारा करण्यासाठी भारताची बाजू मजबूत आहे. पूर्व लडाखच्या स्पांगुर गॅपमधून थेट चीनमध्ये जाता येते. डेमचॉक भागातून ज्याला इंडल वॅली देखील म्हणतात. येथे ५ महत्त्वाच्या भागाची जबाबादारी देखील हे टँ सांभाळू शकतात.
दोन्ही भागात मोकळे मैदान आहेत. जेथे टँक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. इथली जमीन वाळूमय आहे, त्यामुळे येथे टँक जलद गतीने पुढे जावू शकतात. चीनचा महत्त्वपूर्ण जी 219 महामार्ग स्पॅनगुर गॅप किंवा डेमचॉक या दोन्हीपासून 50 किमीपेक्षा जास्त अंतरावर नाही. जर युद्ध सुरु झालं तर चीनला हा महामार्ग वाचवावा लागेल. पण भारताच्या या भीष्म टँकसाठी येथे मारा करणं अधिक सोपं आहे.
२०१६ मध्ये भारताने लडाखमध्ये पहिल्यांदा टँक तैनात केले होते. त्यावेळी टी- ७२ टँक तैनात करण्यात आले होते. परंतु चीनकडून टी 95 टँक तैनात केल्याच्या वृत्तानंतर भारतीय सैन्याने टी 90 टँक तैनात केल्या. १९६२ च्या लढाईतही भारतीय लष्कराने लडाखच्या पुढच्या भागात हलके एएसएक्स टँक पाठवले होते. त्यामुळे चुशूल, पेंगांग झील या भागात चिनी सैन्याविरूद्ध जोरदार लढा दिला होता आणि त्यांना रोखले होते. पूर्वीच्या अनुभवाच्या आधारे, भारतीय लष्कराला हे ठाऊक आहे की चांगल्या टँकमुळे पूर्व लडाखच्या थंड वाळवंटात युद्धाचा मार्ग कसा बदलू शकतो.