मुंबई : अमेरिकेने (America) टिकटॉकला (TikTok App) चांगलाच दणका दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी TIK-TOK ला अमेरिकेतील संपत्ती विकण्याचे आदेश दिले आहेत. जगात कोरोनाचा महामारीच्या खाईत लोटणाऱ्या चीनविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. अमेरिकेने चीनविरोधात उघड उघड दंड थोपडलेत. याचा फटका आता चीनच्या कंपन्यांना बसण्यास सुरुवात झाली आहे. चीनमधील लोकप्रिय टिकटॉक अॅप्लिकेशनलाही जोरदार फटका बसला आहे. आधी भारताने चीनला ५९ अॅप्स बंद केलीत. यात टिकटॉकचाही समावेश आहे.
अमेरिकेत चिनी कंपनी बाईटडन्सचे दिवस वाईट आलेआहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या चिनी कंपनीविरुद्ध ठोस पुरावे आहेत आणि आता हे अमेरिकेतूनही त्यांना जावे लागेल. इतकेच नाही तर एकतर टिकटॉक अॅप अमेरिकन कंपनीला विकता येईल किंवा त्याचा बोऱ्याबिस्तार गुंडाळण्यात यावा.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बाईटडेंसविरूद्ध एक नवीन आदेश जारी केला आहे, त्यानुसार कंपनीने ९० दिवसांच्या आत टिटॉकला कारवाई होण्याआधीच संपत्ती विकावी लागणार आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेत टिकटॉक अॅप बंद करायचा आहे. ट्रम्प यांना विश्वास आहे की बाईटडन्सच्या मागे चिनी गुप्तचर संस्था कार्यरत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, 'बाईडेन्सविरोधात (Bytedance) भक्कम पुरावे सापडले आहेत, जे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीही हे महत्त्वाचे पाऊल आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी टिकटॉकवर बंदी आणण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेतल्या टिकटॉकच्या ऑपरेशनला त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनीला विकण्याचे आदेश दिले. मात्र मायक्रोसॉफ्ट आणि ट्विटरने हे अॅप खरेदी करण्यास उत्सुकता दर्शविली आहे. त्याचबरोबर बाईटडन्स कंपनीच्या कर्मचार्यांनी ट्रम्प यांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले आहे.