काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूत कमी तीव्रतेचा भूकंपाचा झटका जाणवला. यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी भूकंपाच्या हादऱ्याने अनेक लोक घराबाहेर पडले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता खूप कमी होती. मात्र स्थानिक लोकांना त्याचा हादरा जाणवला. मात्र भूकंपाच्या या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.
राष्ट्रीय भूकंप केंद्रातून मिळालेल्या सूचनेनुसार भूकंपाचा हादरा २ वाजून ४ मिनिटांनी बसला. याची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी होती. याचे केंद्र गंगाबू परिसरातील उत्तरेला होता.