तुम्ही खिडक्या नसलेल्या विमानांतून प्रवास करणार?

आमिरात बोईग ७७७-३०० ईआर या विमानाच्या प्रथम श्रेणी केबिनमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आलीय

Updated: Jun 9, 2018, 11:04 AM IST
तुम्ही खिडक्या नसलेल्या विमानांतून प्रवास करणार? title=

मुंबई : येत्या काळात खिडक्यांविना विमान दिसलं तर गोंधळून जाऊ नका... दुबईच्या आमिरात एअरलाईन्सचे प्रमुख सर टिम क्लार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच विमानांना सध्या दिसत असलेल्या खिडक्या नाहिशा होणार आहेत. नुकतंच आमिरात एअरलाईन्सच्या प्रथम श्रेणीच्या केबिन सेक्शनमध्ये हे दृ़श्य पाहायला मिळालं... या केबिनमध्ये एकही खिडकी नव्हती... तरीदेखील प्रवासी बाहेरचं दृश्यं सहजच पाहू शकत होते... कारण एका फायबर ऑप्टिक्सला जोडलेल्या कॅमेऱ्याच्या एका सिस्टमद्वारे बाहेरचं दृश्य पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. यालाच 'व्हर्च्युअल विंडो' असं नाव देण्यात आलाय. क्लार्क यांच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना जे पाहायचं असेल ते या सुविधेमुळे ते पाहू शकतील. 

आमिरात बोईग ७७७-३०० ईआर या विमानाच्या प्रथम श्रेणी केबिनमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आलीय. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या सुविधेमुळे विमानाचं वजनही कमी होण्यास मदत होणार आहे... तसंच विमानाला उड्डाणासाठी अत्यंत कमी वेळ लागेल आणि इंधनाचीही बचत होईल.